रयत बाजारासारखे उपक्रम राबवावे ः डॉ. शिंगणे

रयत बाजारासारखे उपक्रम राबवावे  ः डॉ. शिंगणे ः
रयत बाजारासारखे उपक्रम राबवावे ः डॉ. शिंगणे ः

अकोला  ः ‘‘शेतकरी हिताचे सर्वाधिक उपक्रम अकोला बाजार समितीत राबवले जातात. या बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल, यासाठी रयत बाजारासारखे उपक्रम राबवावे’’, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.  अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत (कै.) वसंतराव धोत्रे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त विशेष कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, उपसभापती नीळकंठराव खेडकर, अनंतराव भुईकार, संग्राम गावंडे, रमेश हिंगणकर, रामसिंग जाधव, श्रीकांत पिसे, महादेव भुईभार आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेली बाजार समिती ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, त्याच्या मालाचे नुकसान होऊ नये, त्याची फसवणूक होऊ नये यासाठी निर्माण झालेली संस्था, अशा या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून मदत करण्याचे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य गौरवास्पद आहे, असे कौतुकही त्यांनी केले.

याप्रसंगी आ. शर्मा, आ. सावरकर, डॉ. संतोष कोरपे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती शिरीष धोत्रे यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com