Agriculture news in marathi Import and export of vegetables banned in Wardha district | Agrowon

वर्धा जिल्ह्यात भाजीपाल्याची आयात-निर्यात करण्यास बंदी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

वर्धा ः वर्धालगतच्या तीन जिल्ह्यांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून भाजीपाला, फळे, दूध तसेच मांस वर्धा जिल्ह्यात आणण्यास २० मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हास्तरीय बैठकीत प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वर्धा ः वर्धालगतच्या तीन जिल्ह्यांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून भाजीपाला, फळे, दूध तसेच मांस वर्धा जिल्ह्यात आणण्यास २० मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हास्तरीय बैठकीत प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राव्दारे विनंती केली की, नागपूर, अमरावती व यवतमाळ हे तीन ‘कोरोना’बाधित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातून होणारी वाहतूक लॉकडाऊन काळापर्यंत थांबविल्यास वर्धा जिल्हा ‘कोरोना’मुक्‍त राहू शकतो. 

या आजूबाजूच्या जिल्ह्यांतून भाजीपाला, फळे इत्यादी वस्तूंची वाहतूक करताना सुमारे १५०० ते १७०० व्यक्‍ती या जिल्ह्यांतून वर्धा जिल्ह्यात येतात. त्यामुळे त्यांच्यासोबतच ‘कोरोना’चा विषाणू जिल्ह्यात प्रवेश करू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक बंदी कायम ठेवावी. यामध्ये चार जिल्ह्यांतून होणारी फळ, भाजी व मांस यांची वाहतूक करण्यास पूर्णतः बंदी राहील. तसेच वर्धा जिल्ह्यातून या वस्तू बाहेर पाठविण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा अंतर्गंत वाहतूक व विक्रीस कोणताही प्रतिबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.  


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...