गीर गाय, सानेन शेळी आयातीला परवानगी द्यावी

ब्राझीलमध्ये संशोधन झालेली भारतीय गीर गाय आणि युरोपीय देशातून सानेन जातीच्या शेळ्या आयातीला परवानगी द्यावी, अशी मागणी दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्याकडे केली.
Import of Gir cow, Sanen goat should be allowed
Import of Gir cow, Sanen goat should be allowed

मुंबई : ब्राझीलमध्ये संशोधन झालेली भारतीय गीर गाय आणि युरोपीय देशातून सानेन जातीच्या शेळ्या आयातीला परवानगी द्यावी, अशी मागणी दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्याकडे केली. 

केदार आणि रुपाला यांची दिल्ली येथे बैठक झाली. या वेळी केदार यांनी जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत राज्याकडून येणाऱ्‍या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. राष्ट्रीय पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत केंद्र सरकारला विविध प्रस्ताव पाठविले आहेत त्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणीही या वेळी केदार यांनी केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशूंच्या विविध जातींचे संकर विकसित करण्यास गती येईल, असे केदार यांनी सांगितले.

याबाबत केदार म्हणाले, ‘‘भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन दुधाळ संकरित जात विकसित करण्यात आली आहे. ही संकरित गीर गाय दिवसाला २५ ते २७ लिटर दूध देते. या गीर गायी भारतात आणून शेतकऱ्यांना द्याव्यात. यासोबतच अधिक दूध देणाऱ्या सानेन जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी, जेणे करून शेळ्यांच्या दुधातून ग्रामीण भागात रोजगार वाढीसाठी मदत होणार आहे. सानेन शेळ्यांचे नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इस्राईलमध्ये संगोपन केले जाते. पशूंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यकता असते, त्या मिळण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com