Agriculture news in marathi The importance of agricultural culture to Sankranti persists even in urban areas | Agrowon

संक्रांतीला कृषी संस्कृतीचे महत्त्व शहरी भागातही टिकून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

आम्ही शेतीमालाची किरकोळ विक्री करतो. सणासाठी मागणी आहे, मात्र महागाई वाढल्याने ग्राहक विचारणा करीत आहेत. 
- शांताबाई साळवे, भाजीपाला विक्रेत्या

नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीला संक्रांतीचा सण येतो. पतंग उडवून, तिळगूळ वाटून स्नेहीजनांसोबत हा सण मोठ्या आनंदाने साजरा होतो. भोगी, मकर संक्रांत व कर अशा तीन दिवस साजरा होणाऱ्या सणाला कृषी संस्कृतीचा मोठा संदर्भ आहे. शहरी भागातही या सणानिमित्त कृषी संस्कृतीचे महत्त्व आजही टिकून आहे.  

मातीच्या बोळक्यांमध्ये भुईमूग शेंगा, गाजर, गव्हाची ओंबी, हरभऱ्याचे घाटे, उसाच्या कांड्या भरून ‘सुगडपूजा’ केली जाते. यासाठी या पिकांना मोठी मागणी असते. यंदा अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान व पुढे गेलेल्या रब्बी हंगामामुळे अत्यल्प प्रमाणात हा शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळाले. तर भोगीसाठी लागणाऱ्या गाजर, वांगी, तीळ, वालपापडी या भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. त्यात आवक कमी व मागणी जास्त असल्याने काही शेतीमालाच्या दरात दुपटीने वाढ झाली. त्यामुळे किरकोळ बाजारात सुगडासाठी लागणाऱ्या मालाची विक्री वाटा पद्धतीने होताना दिसून आली. 

नाशिक बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात सोमवारी (ता. १३) वांग्याची कमी झाल्याने प्रतिकिलो दर दुप्पट होऊन ३० रुपयांपर्यंत होते. तर किरकोळ बाजारात वांग्याची विक्री ५० रुपयांपर्यंत विक्री झाली.

गाजराची आवक मंदावल्याने दरात ५ रुपयांपर्यंत वाढ झाली त्याचे दर ३० रुपये होते, तर किरकोळ बाजारात ६० रुपयांपर्यंत गाजराची विक्री झाली. वालपापडीची आवक दुपटीने वाढल्याने प्रतिकिलो दर ७ रुपयांनी कमी होऊन १३ रुपयांपर्यंत आले, मात्र त्याची किरकोळ बाजारात विक्रीही दुपटीने ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत झाली. 

असा राहिला शेतीमालाचा दर (प्रतिकिलो)

गावरान बोर  ८० रुपये
गाजर ५० रुपये 
गव्हाची ओंबी १०० रुपये प्रतिपेंढी
हरभरा ६० रुपये पेंढी
 

 

 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...