समर्पण, वचनबद्धतेला महत्त्व द्या : डॉ. ज्योत्स्ना शर्मा

समर्पण, वचनबद्धतेला महत्त्व द्या : डॉ. ज्योत्स्ना शर्मा
समर्पण, वचनबद्धतेला महत्त्व द्या : डॉ. ज्योत्स्ना शर्मा

सोलापूर : ‘‘नव्याने रुजू झालेल्या सर्व कृषी हवामानशास्त्र विषय विशेषज्ञ आणि निरीक्षकांनी व्यावसायिक जीवनात समर्पण आणि वचनबद्धतेला महत्त्व द्यावे, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी व्यक्त केले. 

अटारी, पुणे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ग्रामीण कृषी हवामानसेवा (GKMS) अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा राज्यांमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये नव्याने रुजू झालेल्या कृषी हवामानशास्त्र विषय विशेषज्ञ आणि निरीक्षकांसाठी नुकतेच प्रशिक्षण पार पडले.

कृषी हवामानावर आधारित कृषी सल्लानिर्मिती व प्रसार हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विषय होता. १८ ते २४ ऑगस्ट या सात दिवसांच्या कालावधीत हे प्रशिक्षण झाले. डॉ. शर्मा अध्यक्षस्थानी होत्या. या प्रसंगी अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, बंगरुळातील अटारीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डीव्हीएस रेड्डी, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. के. घोष, कृषी हवामानशास्त्र विभाग, पुण्याचे विभागप्रमुख डॉ. जे. डी. जाधव हे उपस्थित होते.

डॉ. लाखन सिंग यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये नव्याने रुजू झालेल्या कृषी हवामानशास्त्र विषय विशेषज्ञ आणि निरीक्षकांचे स्वागत करून त्यांच्या कृषी हवामानावर आधारित कृषी सल्लानिर्मिती व प्रसार क्षेत्रातील भूमिका व जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधले.  डॉ. घोष म्हणाले, ‘‘कृषी हवामानावर आधारित अचूक माहिती संकलनाचे महत्त्व अधोरेखित करून त्याच्या आधारे शेतकऱ्यांना कृषी सल्ला द्यावा, जेणेकरून त्यांना त्याच्या शेतीचे योग्य ते नियोजन करता येईल.’’  केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड, ‘केव्हीके‘चे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, दिनेश क्षीरसागर, अजय दिघे, सुयोग ठाकरे, दिनकर चौधरी यांनी परिश्रम घेतले. 

विशेषज्ञांना कृषी हवामानाचे प्रशिक्षण

या प्रशिक्षणादरम्यान कृषी हवामान शास्त्र विभाग व त्याची कार्यप्रणाली, रिमोट सेन्सिंगद्वारे पृथ्वीवरील हवामानाचा अंदाज, वातावरणातील बदल, स्वयंचलित हवामान केंद्र, निरीक्षणे व कृषी हवामान आधारित तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कृषी सल्लानिर्मितीबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com