जनावरांमध्ये वजन मापनाचे महत्त्व

गर्भधारणा व योग्य प्रजननासाठी जनावराचे विशिष्ट वजन असणे आवश्यक असते त्यामुळे जनावरांचे वेळोवेळी वजन करावे.
गर्भधारणा व योग्य प्रजननासाठी जनावराचे विशिष्ट वजन असणे आवश्यक असते त्यामुळे जनावरांचे वेळोवेळी वजन करावे.

जनावरांना दैनंदिन व्यवस्थापनात त्यांच्या शरीर वजनाच्या मापनाचे विशेष महत्त्व असते. जनावरांना लागणारा चारा आणि पाणी यांची गरज ही त्यांच्या शारीरिक वजनावर अवलंबून असते. तसेच बऱ्याच जनावरांची विशेषतः मांसल प्राण्यांची (शेळी, मेंढी इ.) बाजार किंमत ही त्यांच्या वाजनावरूनच ठरते. गर्भधारणा व योग्य प्रजननासाठी जनावराचे विशिष्ट वजन असणे आवश्यक असते. अशा अनेक कारणांमुळे जनावरांचे वेळोवेळी वजन करणे आवश्यक असते. वजन मोजणे का महत्त्वाचे अाहे १. जनावरांसाठी आवश्यक दैनंदिन चारा आणि पाणी यांचे प्रमाण ठरविण्यासाठी त्यांचे वजन जाणून घेणे गरजेचे असते. २. मांसल जनावरांचा (शेळी, मेंढी इ.) बाजारभाव ठरविण्यासाठी. ३. जनावरांचे पैदासक्षम वय तसेच त्यांचे गर्भधारणा व प्रजनन योग्य वय जाणून घेण्याकरिता.

  • जनावरांना तारुण्यावस्थेत पदार्पण करण्यासाठी आपल्या एकूण प्रौढ वजनाच्या ४५-५० टक्के वजन ग्रहण करणे आवश्यक असते.
  • प्रजननक्षम होण्यासाठी त्याचे वजन एकूण प्रौढ वजनाच्या ५५ टक्के असणे आवश्यक असते.
  • प्रथम वेतावेळी जनावराचे वजन प्रौढ वजनाच्या तुलनेत ८२ टक्के असावे.
  • दुसऱ्या वेताच्या वेळी जनावराचे वजन प्रौढ वजनाच्या तुलनेत ८२ टक्के असावे.
  • तिसऱ्या वेतापर्यंत जनावरांनी त्यांच्या प्रौढ वजनाच्या १०० टक्के वजन ग्रहण केलेले असते.
  • ४. वजनावरून जनावरांच्या आरोग्यासंबंधी तसेच उत्पादन क्षमतेसंबंधी अंदाज बांधण्यास मदत होते. ५. जनावरांच्या प्रजनन क्षमतेविषयी अंदाज बांधता येतो. ६. आजारादरम्यान जनावरांना द्यावयाच्या औषध मात्रेसाठी वजनाचा उपयोग होतो. सहसा ग्रामीण भागात पशुपालकाकडे जनावरांचे वजन मोजता येईल असा भव्य वजन काटा उपलब्ध नसतो. त्यामुळे जनावराचे वजन जाणून घेणे शक्य होत नाही. पुढील सूत्रांचा उपयोग करून जनावरांचे वजन काट्याविनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मोजता येते. त्यासाठी केवळ एका लांबी मोजण्याच्या टेपपट्टीची आणि गणकयंत्राची (कॅल्क्युलेटर) आवश्यकता असते. वजन मोजण्याची पद्धत सर्वप्रथम टेप पट्टीने शरीराची लांबी (इंच) आणि छातीचा घेर (इंच) मोजून घ्यावा आणि या संख्या खालील सूत्रात टाकून गणना करावी. मिळालेले उत्तर हे त्या जनावराचे वजन असेल (पौंड मध्ये). (१ पौंड = ०.४५ किलो). १. अग्रवाल यांचे सूत्र (Agarwal’s formula): अग्रवाल यांचे सूत्र हे देशी गायींसाठी उपयुक्त आहे. वजन = शरीर लांबी × छातीचा घेर/Y *शरीर लांबी ः जनावराची लांबी मोजून घ्यावी. *छातीचा घेर ः  छातीचा घेर मोजून घ्यावा. Y ची किंमत ही छातीचा घेरानुसार बदलते. छातीचा घेर जर ६५ इंच ते ८० इंच या दरम्यान असेल तर Y ची किंमत ८.५ एवढी घ्यावी. जर हृदय छातीचा घेर ६५ पेक्षा कमी आणि ८० पेक्षा अधिक असेल तर Y ची किंमत ही अनुक्रमे ९ आणि ८ एवढी घ्यावी. २. शेफर्स यांचे सूत्र (Shaeffer’s formula): शेफर्स यांचे सूत्र हे विदेशी किंवा संकरीत जातींच्या गायींसाठी उपयुक्त आहे. वजन = शरीर लांबी × (२ x छातीचा घेर)/३०० संपर्क ः वैभव सानप, ९४५५१४८१७२ (डॉ. सानप भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर, उत्तर प्रदेश येथे तर डॉ. पतंगे एटापल्ली, गडचिरोली येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com