पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व

पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य ही अत्यल्प प्रमाणात लागतात. मात्र, पिकांच्या जीवनचक्रात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरेमुळे पिकांच्या वाढीवर, पिकांवर अनिष्ट परिणाम दिसून येतात.
Molybdenum deficiency in citrus fruits
Molybdenum deficiency in citrus fruits

पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य ही अत्यल्प प्रमाणात लागतात. मात्र, पिकांच्या जीवनचक्रात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.   सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरेमुळे पिकांच्या वाढीवर, पिकांवर अनिष्ट परिणाम दिसून येतात. बोरॉन 

  • हे अन्नद्रव्य पिकांच्या जननक्रियेत भाग घेते. कोष विभाजनाच्या प्रक्रियेकरीतादेखील बोरॉनची गरज असते. पिष्टमय पदार्थाच्या वहनास बोरॉनच्या अस्तित्वामुळे चालना मिळते. पाण्याचा पिकांवर होणारा ताण सोसण्यास बोरॉन मदत करते.
  •  बोरॉनची कमतरता असलेल्या पिकांच्या नत्राचे प्रमाण अधिक असते. बोरॉनची कमी हालचाल आणि कमी वाहकता असल्याने पिकांच्या मुळ्यांमधून वरच्या अवयवापर्यंत पोहोचण्याकरीता उशीर लागतो.
  • बोरॉनची कमतरतेमुळे पानाचे शेंडे काळे पडतात. कोवळी पाने आणि कळ्या गळतात. वाढबिंदूची वाढ खुंटते. पेशीकोष ठिसूळ, कठीण आणि कोरडे होतात. फुले कमी येतात, फळे ठिसूळ होऊन त्यावर भेगा पडतात.
  • मॉलिब्डेनम 

  • नत्रस्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जंतूंची क्रियाशीलता वाढते. पिकांमध्ये मॉलेब्डेनमची कमतरता असेल तर प्रथिनांची पूर्ण वापर होत नाही. प्रथिन संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पिकांमध्ये नायट्रेटयुक्त नत्राचे प्रमाण वाढते.
  • पिकांची नत्र शोषण करण्याची शक्ती मॉलेब्डेनमच्या कमतरतेमुळे जाणवते. पिकांची नत्र शोषण करण्याची स्पष्ट लक्षणे फ्लॉवरवर दिसतात. पानाच्या सर्व बाजूला गेरवा रंग येऊन पाने कोरडी पडतात. चुरमुडल्यासारखा आकार येतो. फुले-फळे गळायला लागतात. पुष्कळदा दाणे आणि फळेसुध्दा भरत नाहीत.
  • क्लोरीन 

  • प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी क्लोरीनची गरज असून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून पेशीतील रसाकर्षण दाब (ऑस्मोटीक प्रेशर) उंचावतो आणि पेशीकोषातील आर्द्रता टिकविली जाते.
  • क्लोरीनची कमतरता नवीन पानातील पिवळेपणा दर्शविते. पाने निस्तेज होतात. टोमॅटोच्या पानाच्या कडा कमतरतेमुळे करपतात.
  • सोडियम  सर्वसाधारण वनस्पती / पिकांच्या योग्य वाढीसाठी सोडीयम सूक्ष्म प्रमाणावर आवश्यक आहे. पेशी कोषामध्ये योग्य प्रमाणात आर्द्रता आणि क्षारांचा समतोल साधण्यात सोडीयमचा महत्त्वाचा भाग असतो. कोबाल्ट  नत्रस्थिरीकरण करणाऱ्या द्विदल धान्यासाठी/सूक्ष्म प्रमाणात कोबाल्टची गरज असते. कोबाल्ट हे अन्नद्रव्य मुळ्यांच्या गाठीमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले, म्हणजेच नत्रस्थिरीकरणाचा वेग आणि नत्र स्थिरीकरणाच्या सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत वाढ करण्याची क्षमता कोबाल्टमध्ये आहे. संपर्क ः डॉ. संतोष चिक्षे, ७५८८०८२०१४ ( सहाय्यक प्राध्यापक,मृद विभाग, कृषी महाविद्यालय,परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com