औषधी अळिंबीचे आहारातील महत्त्व

अळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा कोरडी पडू न देता ओलसर ठेवतात. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. हे गुणधर्म त्वचेला ओलसर, गुळगुळीत आणि कोमल बनविण्यासाठी फायदेशीर ठरते.
importance  of mushroom in the diet
importance of mushroom in the diet

अळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा कोरडी पडू न देता ओलसर ठेवतात. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. हे गुणधर्म त्वचेला ओलसर, गुळगुळीत आणि कोमल बनविण्यासाठी फायदेशीर ठरते.  प्राचीन काळापासून अळिंबीच्या पदार्थांना मिष्टान्न म्हणून ओळखले जाते. अळिंबीस आहारात वैशिष्ठ्यपूर्ण पौष्टिक स्थान आहे. अळिंबीतील अनेक पोषकद्रव्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मधुमेह, ह्रदयविकार, स्थूलपणा, त्वचेचे आरोग्य राखण्यास, कुपोषणावर मात करण्यासाठी तसेच पोटाच्या विविध विकारांवर अळिंबी गुणकारी आहे. अळिंबीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ असतात.  त्यामुळे अळिंबी अतिशय सात्त्विक आणि पौष्टिक आहार मानला जातो. मधुमेहींसाठी उत्तम आहार

  • अळिंबीमध्ये साखर आणि स्टार्चची मात्रा फार कमी असते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण फार कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी पौष्टिक अन्न मानले जाते.
  • अळिंबीमुळे शरिरात इन्सुलिन निर्मितीस मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी अळिंबी एक उत्तम आहार आहे. 
  • यामध्ये विशिष्ट प्रकारचे मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच मधुमेह नियंत्रित करून त्याचा प्रभाव प्रतिबंधित केला जातो. 
  • हृदय विकारांवर गुणकारी

  • ह्रदयाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि ह्रदयाचे आरोग्य राखण्यास अळिंबीचे सेवन फायदेशीर ठरते. 
  • अळिंबी कोलेस्ट्रॉल आणि साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते. 
  • अळिंबीमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ, हिरसटिक आम्ल, कयूनान, भरेटिनी आम्ल, फिनोलिक आम्ल, राइबोफ्लेविन, प्यूरीन, फॅटी आम्ल तसेच एन्झायम सारखे घटक असतात. हे घटक कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात.
  • अळिंबीमध्ये पोटॅशिअम आणि सोडिअम या क्षारांचे संतुलित प्रमाण असते. यामुळे रक्त वाहिन्यांचे कार्य सुरळीत चालते. तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अळिंबी उत्तम कार्य करते.
  • लठ्ठपणापासून बचाव

  •  वजन वाढविणे फारसे अवघड नाही, परंतु कमी करणे मुश्कील असते. 
  • वजन कमी करण्यासाठी अळिंबी एक चांगला नैसर्गिक पर्याय आहे. 
  • अळिंबीमध्ये तंतुमय पदार्थ आणि विविध जैवसक्रिय संयुगे आढळतात. ही संयुगे लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करतात. 
  • अळिंबीतील विविध घटकांमुळे (जीवनसत्त्व ब-२ व ब-३) आपण खालेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर लवकर होते. त्यामुळे चयापचय करण्यासाठी लागणारी ऊर्जा तयार होऊन चयापचय क्रिया सुरळीत होते. परिणामी वजम कमी होण्यास मदत होते.
  • तसेच अळिंबीमधील अँटीऑक्सिडेटिव्ह गुणधर्म वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. 
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित शारीरिक व्यायामासह अळिंबीचे सेवन महत्त्वाचे आहे.
  • वेदनाशामक गुणधर्म

  • अळिंबीमध्ये फॉलिक आम्ल, लोह, कॅल्शिअम, सल्फर, पोटॅशिअम इत्यादी घटक घटक असतात. हे घटक शरीराच्या मजबुतीसाठी खूप गरजेचे असतात.
  • मांसपेशी आणि हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. सांधेदुखीच्या त्रासामध्ये अळिंबीचे सेवन केल्याने आराम मिळतो.
  • पोटाच्या समस्येवर गुणकारी

  • अळिंबीच्या सेवनामुळे पोटातील गॅस व बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते. 
  • आम्लपित्त, अपचन, पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते. 
  • अळिंबीमध्ये अल्सरची काही लक्षणे बरी करण्याचे गुणधर्म असतात. यासाठी अळिंबीचा अर्क फायदेशीर ठरू शकतो.
  • हिमोग्लोबीनचे प्रमाण संतुलित ठेवते  अळिंबी सेवनामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित राहते. यामध्ये फॉलिक आम्लाचे प्रमाण भरपूर असते. कुपोषणापासून बचाव

  • कुपोषणावर मात करण्यासाठी अळिंबी प्रभावी मानली जाते. 
  • अळिंबीमध्ये असणारी प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे व कर्बोदके बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना कुपोषणापासून वाचवतात.
  • केस गळणे रोखणे

  • केसगळती रोखण्यासाठी अळिंबीचे सेवन फायदेशीर ठरते. अळिंबीला जीवनसत्त्व-ड, अँटिऑक्सिडेंट्स, लोह, सेलेनियम आणि तांबे यांचा चांगला स्रोत मानले जाते.
  • हे सर्व पोषक घटक केस गळतीची समस्या दूर करण्यास आवश्‍यक असतात. ते केसांना निरोगी आणि मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर ठरतात. 
  • डोक्यात होणारा कोंडा टाळण्यासाठी अळिंबी उपयुक्त आहे.
  • त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त

  • अळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा कोरडी पडू न देता ओलसर ठेवतात. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
  • हे गुणधर्म त्वचेला ओलसर, गुळगुळीत आणि कोमल बनविण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच त्वचेसंबंधीच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतात. 
  • हे घटक त्वचेला नैसर्गिक चकाकी देतात. त्यामुळे त्वचा गोरी होते.
  • तरुण मुला-मुलींना मुरुमांचा त्रास होतो. औषधोपचाराने ही मुरूमे कमी झाली तरी चेहरा विद्रूप दिसतो. या समस्येवर मात करण्यासाठी अळिंबी फायदेशीर ठरू शकते.  अळिंबीमध्ये जीवाणूरोधक घटक आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. मुरुमांमुळे उद्भवणाऱ्या जिवाणूंना प्रतिबंधित करण्यात हे मदत करतात. याव्यतिरिक्त, मुरूम कमी करण्यात देखील हे गुणधर्म फायदेशीर ठरतात.
  • वयोमानानुसार त्वचा रखरखीत, जुनी दिसून चेहऱ्यावर सुरकुत्या उमटतात. त्यासाठी अळिंबीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
  • वैज्ञानिक संशोधनानुसार अळिंबीच्या अर्कामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि अकाली वृद्धत्व येण्यापासून रोखण्यास मदत करतात. 
  • संपर्क ः डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११    (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com