आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
शेडनेट पिके
संरक्षित शेतीचे महत्त्व
संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे. रोपवाटिका तयार करणे. उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे. इत्यादींसाठी केला जातो.
संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे. भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका तयार करणे. उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे. इत्यादींसाठी केला जातो.
संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो. हरितगृह, शेडनेटगृहाचा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो.
- फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे.
- भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका तयार करणे.
- उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे.
- भाजीपाला पिकांच्या जाती व बीज उत्पादन घेणे.
- पिकांचे संशोधन व विकास करणे.
- गारा, बर्फ या पासून संरक्षण करणे.
खालील पिकांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेता येते.
- फुलपिके : प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते.
- भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळीचे उत्पादन घेतले जाते.
- पालेभाज्या : बिगरहंगामी कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी यांचे उत्पादन घेणे शक्य होते.
- परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकिनि, लेट्युस, लिक, पार्सेली इ.
- औषधी पिके : हळद, आले, मीट, बसीगिल इ.
- फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज, डाळिंब, द्राक्ष, केळी अशा संवेदनशील पिकांचे उत्पादन घेता येते.
संरक्षित शेतीअंतर्गत येणाऱ्या आधुनिक शेती पद्धती
- व्हर्टिकल फार्मिंग (मजल्याची शेती),
- डीप फार्मिंग (भूमिगत व्हर्टिकल फार्मिंग),
- हायड्रोपोनिक्स अथवा ॲक्वापॉनिक्स (मातीविना पाण्यावरील शेती)
- एअरोपोनिक्स (हवेमध्ये मुळांची वाढ करून केली जाणारी शेती).
या आधुनिक शेतीमध्ये घेतली जाणारी उत्पादने
- परदेशी व देशी पालेभाज्या, परदेशी फुले, डच गुलाब, शेवंतीचे विविध प्रकार इ.
- जनावरांसाठी हिरवा चारा आणि ताजा चारा मिळण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, तसेच काही कडधान्ये उदा. चवळी, मूग यांचेही चारा उत्पादन घेता येऊ शकते.
- शहरी भागात कमी जागेमध्येही काही अत्यावश्यक भाज्या व पिकांचे उत्पादन घेण्यासाठी या पद्धती महत्त्वाच्या ठरतात. औषधी किंवा पोषक मानली जाणारे गव्हाचे तृणांकुर, विविध कडधान्यांचे तृणांकुर इ. निर्मितीसाठी हे तंत्र अधिक फायदेशीर आहे.
संपर्क- डॉ. प्रल्हाद जायभाये - ७९८०६८४१८९
(कृषी हवामान शास्त्रज्ञ व प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)