Agriculture news in marathi The importance of voting for the strengthening of democracy: Dwivedi | Agrowon

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व ः द्विवेदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. ही व्यवस्था टिकवण्याचे आणि बळकट करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच, लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व असाधारण आहे. प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांची मतदार नोंदणी करून निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,’’ असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. ही व्यवस्था टिकवण्याचे आणि बळकट करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच, लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व असाधारण आहे. प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांची मतदार नोंदणी करून निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,’’ असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

दहाव्‍या राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील जिल्हा क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी  सुधाकर भोसले, उपजिल्‍हाधिकारी रोहिणी नऱ्‍हे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार उमेश पाटील, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, रमाकांत काटमोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने या वेळी उपस्थित होत्या.

सकाळी मतदार जागृती रॅलीस जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरुवात झाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. ही रॅली टिळक रस्त्यामार्गे आयुर्वेद महाविद्यालय चौक, जुनी महापालिका इमारत, पंचपीर चावडी, माळीवाडा वेस, महात्मा गांधी पुतळ्यामार्गे काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटविण्याबाबतची प्रतिज्ञा देण्यात आली.


इतर बातम्या
राज्यातील लॉकडाउनबाबत उद्या बैठकमुंबई : केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनचे...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन...नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे २५...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
बीड विभागात कापसाची १६ लाख ११ हजार...बीड : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची साथ...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
शेतकऱ्यांनी न खचता सज्ज राहावे ः...परभणी : ‘‘मराठवाड्यातील शेती पुढे अनेक समस्‍या...
नायगावात कोट्यवधीचा कापूस आगीमुळे खाक नांदेड : जिल्ह्यातील नायगाव येथील भारतीय कापूस...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
आधुनिक लागवड तंत्रज्ञान स्विकारा ः डॉ....अर्धापूर, जि.नांदेड : ‘‘सोयाबीन हे एक महत्त्वाचे...
मराठवाड्यात ३२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा...औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील...
जळगावात पीक कर्जवाटपाबाबत नुसत्याच...जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
‘ॲग्रो ॲम्ब्युलन्स’द्वारे पिकांवरील...नाशिक : मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान...
सोलापुरात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष...सोलापूर ः जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार...सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा...
सोलापुरात पीककर्जाबाबत बँकांचे धिम्या...सोलापूर ः खते-बियाणे पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन...
नाशिक जिल्ह्यात पूर्वहंगामी टोमॅटो...नाशिक  : मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत...
सांगलीत शेतकरी अपघात विम्याचे २७३...सांगली ः शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू, अवयव निकामी...
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढसातारा ः जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांसह इतर...