Agriculture news in marathi, Impression of 'KVK' in dissemination of technology: Dr. Singh | Page 2 ||| Agrowon

तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा ठसा : डॉ. सिंग

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने वेगळा ठसा उमटविला आहे. त्याला व्यापक रूप देण्यासाठी कृषी आणि संलग्न विभागांनी त्यात सहभाग घ्यावा’’, असे मत कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी), पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी शुक्रवारी (ता.२४) येथे व्यक्त केले.

सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने वेगळा ठसा उमटविला आहे. त्याला व्यापक रूप देण्यासाठी कृषी आणि संलग्न विभागांनी त्यात सहभाग घ्यावा’’, असे मत कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी), पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी शुक्रवारी (ता.२४) येथे व्यक्त केले.

सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये डॉ. सिंग बोलत होते. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. ‘केव्हीके’चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, राष्ट्रीय सुक्ष्म तृणधान्य संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. परशुराम पत्रोती, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस.ई. ईप्पर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रतिनिधी डॉ. एम. जी. बंडगर, कृषी विभागाचे प्रतिनिधी सी. बी. मंगरुळे, सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे, शेतकरी प्रतिनिधी संतोष काटमोरे, धनाजी शेळके, अमोल काकडे, लक्ष्मी बिराजदार, अनिता माळगे, वनिता तंबाखे आदी उपस्थित होते.  

डॉ. सिंग म्हणाले, ‘‘केव्हीकेतर्फे माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून अधिकाधिक वेगाने आणि तंत्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना पुरवली जाते आहे. क्युआर कोड, फेसबुक, युट्युब व व्हॉट्‌सअॅप यांसारख्या सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.’’ 

गायकवाड म्हणाले, ‘‘केव्हीके शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी सदैव तत्पर आहे. या पुढेही सर्व विभागाच्या समन्वयाने आणखी वेगळे प्रयत्न करू.’’ डॉ. तांबडे यांनी प्रास्ताविक केले. त्यात केव्हीकेच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी पाहुण्यांच्या हस्ते शेवग्यावरील घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या बैठकीत गेल्या वर्षभरात केलेले काम आणि आगामी वर्षभरातील आराखड्यासंबंधी त्या त्या विषयानुसार विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री, समाधान जवळगे, विकास भिसे, डॉ. प्रकाश कदम, अनिता सराटे,  प्रदीपकुमार गोंजारी, राजेंद्र नेहे, डी. एन. मूर्ती यांनी आपापल्या विषयाचे सादरीकरण केले.


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरुनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा...
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५०...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
 कांदा दरात पुन्हा झाली घसरण नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी,...
नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली...
कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले...येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून...
पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...