नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
लाचखोर तलाठ्यास कारावास
सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा हजारांची लाच मागितल्याचा आरोप सिद्ध झाला. या प्रकरणी न्यायालयाने लाचखोर तलाठ्यास ६० हजार रुपये दंडासह दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
वर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा हजारांची लाच मागितल्याचा आरोप सिद्ध झाला. या प्रकरणी न्यायालयाने लाचखोर तलाठ्यास ६० हजार रुपये दंडासह दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
धानोराचे तत्कालीन तलाठी रामदास मधुकर ठाकरे यांनी सातबारावरील चूक दुरुस्त करण्यासाठी तक्रारदारास पंधरा हजारांची लाच मागितली होती. पण तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्याआधारे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत लाचखोर तलाठी रामदास ठाकरे याला पंधरा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले होते.
या प्रकरणाचा तपास करून पोलिस उपअधीक्षक देवकी उईके यांनी हिंगणघाट येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आरोपी रामदास ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या विविध कलमान्वये दोन वर्षाचा कारावास आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ॲड. प्रसाद सोईतकर यांनी या प्रकरणात सरकारची बाजू मांडली.