Agriculture news in Marathi, Improve banana prices in Jalgaon | Page 2 ||| Agrowon

जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

जळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच होती. यामुळे दरात सुधारणा सुरूच राहिली. जळगाव, चोपडा भागात कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल १५९० रुपये दर मिळाला. क्विंटलमागे ४० रुपयांची सुधारणा मागील १२ ते १३ दिवसांत झाली आहे. 

जळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच होती. यामुळे दरात सुधारणा सुरूच राहिली. जळगाव, चोपडा भागात कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल १५९० रुपये दर मिळाला. क्विंटलमागे ४० रुपयांची सुधारणा मागील १२ ते १३ दिवसांत झाली आहे. 

केळीची आवक चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत रोडावली आहे. उतिसंवर्धित केळी बागांमधील काढणी आठवडाभरात वेगात झाली. यामुळे केळी बागा लवकर रिकाम्या झाल्या. पारंपरिक वाणांच्या केळी बागांमधील काढणी सुरू आहे. परंतु चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत या बागा कमी आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागांत केळीची उपलब्धता अजूनही हवी तशी नाही. मध्य रावेरातील धामोडी, ऐनपूर आणि सातपुडा पर्वतालगतच्या केऱ्हाळे, पिंप्री, चिनावल आदी भागांतही केळी फारशी काढणीवर नाही. 

मध्यंतरी दुर्गोत्सवामुळे उत्तर भारतातून मागणी होती. अलीकडे थंडीची चाहूल लागताच केळीची मागणी टिकून राहिली. जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर भागात मिळून प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक झाली. तर मुक्ताईनगर, यावल, रावेर या भागांत प्रतिदिन १४० ट्रक केळीची आवक झाली. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारातही केळीची आवक प्रतिदिन २२० ट्रकपर्यंत राहिली. तेथेही हवी तेवढी आवक नसल्याने दर टिकून आहेत. 

फरकासह जळगाव, चोपडा भागातील केळीला १६०० रुपयांवर दर मिळाले. जळगाव जिल्ह्यातून राज्यात कल्याण, ठाणे या भागातही केळीची पाठवणूक झाली. तर नागपूर, छत्तीसगड, राजस्थान या भागातही कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक झाली. सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल), चोपडा येथील केळीच्या एजंटकडून उत्तर भारतात दर्जेदार केळीची बॉक्‍समध्ये पॅकिंग करून पाठवणूक झाली. दर महिनाभरापासून टिकून असून, पुढे आवक रोडावण्याचे संकेत आहेत. दर्जेदार केळीचा तुटवडा पुढे जाणवू शकतो, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत घट, दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये गवार, शेवग्याच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवक, मागणीत वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २५०० ते २८०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार १५०० ते २५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात मूग १५०० ते ८९४० रूपये क्विंटलपुण्यात ब्रॅंडेड मुगाला ७५०० ते ८५०० रुपये...
खानदेशात मूग ३२०० ते ६००० रुपये...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ५६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये बाजरी, मुगाचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवकेत वाढ;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, वांग्यांचे दर...सोलापूर  ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, मटारची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद येथे कोबी ५०० ते ८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...