Agriculture news in Marathi Improve onion, garlic, potato prices in Pune Market | Agrowon

पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 जानेवारी 2020

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली होती. तर कांदा, बटाटा, लसूण हिरवी मिरची आणि सिमला मिरचीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली होती.  

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली होती. तर कांदा, बटाटा, लसूण हिरवी मिरची आणि सिमला मिरचीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली होती.  

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून १० ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, मध्यप्रदेशातून मटार सुमारे १८ ट्रक, मध्यप्रदेशातून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १ हजार २०० पोती, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, कोबी, सिमला मिरची, आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, गवार ८ टेम्पो, पावटा ५ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, काकडी १० टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ४००-४८०, बटाटा : २००-२६०, लसूण : १२००-१८००, आले : सातारी २५०-४५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान ५००-५५०, सुरती ५००-७००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ३००-३५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २००-२५०, काकडी : ५०-८०, कारली: हिरवी २००-२५०, पांढरी: १८०-२००, पापडी : २००-२२०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ६०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल: २५०-३००, ढोबळी मिरची : ०३०-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ८००-१०००, गाजर : २००-२२०, वालवर : २००-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १८०-२२०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : वाळलेली ६००, मटार : परराज्य २८०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

फळबाजार
रविवारी (ता. १९) येथील बाजारात मोसंबी ४० टन, संत्री सुमारे २० टन, डाळिंब २५०, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे दीड हजार गोणी, द्राक्षे सुमारे ९ टन,  पेरू १ हजार २०० क्रेट, चिक्कू २ हजार डाग आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-१५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२८०, (४ डझन ) : ४०-१००, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन ) : ५०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ९००-१४००, किन्नोर -(२५-३०) - २४००-३०००, सिमला - (२५-३०)- १ ८०० ते २५००, बोरे (१० किलो) : चेकनट : ५५०-६००, उमराण : २०-३०, चमेली : ८०-१५०, चण्यामण्या : ४००-४५०.

पालेभाज्या 
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १९) कोथिंबिरीची सुमारे दोन लाख, मेथीची सुमारे ५० हजार जुड्यांची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००, मेथी : ६००-१०००, शेपू : ५००-६००, कांदापात : ८०० -१५००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ५००-७००, चुका : १०००-१२००, चवळई : ६००-७००, पालक : ५००-७००. हरभरा गड्डी -३००-६००.

फुले
लग्न हंगाम सुरू झाल्याने कट फ्लॉवरला मागणी वाढली असून दर देखील १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ६०-१००, बिजली -३०-६०,  कापरी : २०-४०, शेवंती : ६०-१२०, अ‍ॅस्टर : १०-१४, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१८०, लिलि बंडल : ६-१२, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन - १००-१६०. 

मटण मासळी 
राज्यातील थंडी वाढल्याने मासेमारी वेळी कमी मासळी मिळत असल्याचा परिणाम बाजारावर झाला असून, बाजारातील मासळीच्या आवकेत घट झाली आहे. यामुळे पापलेट, सुरमई, हलवा आदी सर्व मासळीच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. दरम्यान गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी (ता. १९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची सुमारे २५० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर चिकन, मटण आणि अंड्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : २०००, मोठे  १५००, मध्यम : ९००-१०००, लहान ७००-८००, भिला : ६००-६५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ६५०-७५०, रावस : लहान - ६५०, मोठा : ८००-९००, घोळ : ७००, भिंग : ३६०, करली : २४०-२८०, करंदी :  ४००, पाला : लहान ८००, मोठे : ११००-१२००, वाम : ४८०-५५०, मोठे   ६५० -७००, ओले बोंबील : १६०-२००.

कोळंबी 
लहान ४४०, मोठे : ५५०, जंबोप्रॉन्स : १४००-१५००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २८०, मांदेली : १४०, राणीमासा :२०० खेकडे : २००-, चिंबोर्‍या : ५५०-६००.

खाडीची मासळी 
सौंदाळे : २८०, खापी : २८०, नगली : ४८०, तांबोशी : ४००-४८०, पालू : २८०, लेपा : लहान : १४० मोठे २४०-२८० , शेवटे : ३२०, बांगडा : लहान २८० , मोठे २८०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १६०.

नदीची मासळी 
रहू :१६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १२०, खेकडे : २०० वाम : ५५०.

चिकन 
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.

अंडी  
गावरान : शेकडा : ८५० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४६५ डझन : ६६ प्रतिनग : ५.५०

मटण 
बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८०  खिमा : ५८०-, कलेजी : ६४०.
 

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा २०० ते २५०० रुपये क्विंटललासलगावात १००० ते २२११ रुपये दर नाशिक :...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...