जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
ताज्या घडामोडी
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सातारा जिल्हा बँकेच्या पुढाकार
सातारा जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी पिकायोग्य नसल्याने त्या जमिनी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या बनल्या आहेत. त्या या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुढाकार घेतला आहे.
सातारा : जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी पिकायोग्य नसल्याने त्या जमिनी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या बनल्या आहेत. त्यामुळे जमीन असून, शेती करता येत नाही. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुढाकार घेतला आहे.
बॅंकेने या जमिनी वहिवाटखाली आणण्यासाठी विशेष कर्ज योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतून क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमुळे क्षारपड जमिनीला आता नवसंजीवनी मिळणार असून, शेतकऱ्यांना पुन्हा शेतमाल पिकवता येणार आहे.
राज्यात काळ्या जमिनीचे क्षेत्र जास्त आहे. भारी काळ्या जमिनीची निचरा क्षमता कमी असते. भुपुष्ठापासून कमी खोलीवर असणारा अभेद थर, पिकांसाठी पाण्याचा अतिवापर, खारवट पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनॉल, तलाव, धरणे यांच्या पाणी पाझरणे आदी कारणाने काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन सुपीक जमिनी नापिक होताना दिसत आहेत. हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यात कालव्यातील सुटणाऱ्या पाण्यामुळे शेतीत बारमाही पीक पद्धत प्रचलित आहे. या कालव्या लगतच्या शेतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड बनल्या आहेत. या जमिनी हाताखाली आणण्याचे काम शेतकऱ्यांना अतिशय कष्टप्रद आहे.
शेतीत निचरा प्रणाली राबविण्यासाठी आर्थिक बाजू सक्षम नसल्याने त्या जमिनी नापिक बनल्या आहेत. परिणामी गेली कित्येक वर्षांपासून त्या पडीक आहेत. या शेतजमिनी असून, खोळंबा अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. यावर उपाय म्हणून निचरा प्रणालीचा अवलंब करून काही शेतकऱ्यांनी जमिनी हाताखाली आणल्या आहेत. परंतु, सर्वच शेतकऱ्यांना हा प्रयोग शक्य नसल्याने शेती पडून राहात आहे. ही समस्या ओळखून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने क्षारपड जमीन सुधारणा कर्ज धोरण योजना सुरू केली आहे. या कर्ज योजनेच्या धोरणात शेतकरी २० गुंठे व जास्ती जास्त पाच एकरपर्यंत पात्र असणार आहे. एकरी ८० हजार रुपये अथवा अंदाजपत्रकाच्या ९५ टक्के यापैकी कमी असलेल्या रक्कमेचा कर्जपुरवठा केला जाणार आहे.
कर्जाच्या परतफेडीचा कालावधी सात वर्षे असून, निकषाप्रमाणे व्याजदर ठेवत सात समान हप्त्यात परतफेड करावी लागेल. लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात निचरा प्रणाली राबवताना त्याचा आउटलेट दूरपर्यंत असल्यास लागणारा जादा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः द्यावयाचा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
कऱ्हाड तालुक्यातील गावांना भेटी
क्षारपड शेतजमिनीचे कऱ्हाड तालुक्यात प्रमाण जास्त असल्याने या तालुक्यातील सहा गावांना नुकतीच जिल्हा बॅंकेच्या प्रशासन व वित्त विभागाचे सरव्यवस्थापक आर. एस. गाढवे, हायटेक विभागाचे उपव्यवस्थापक संदीप शिंदे, जिल्हा बॅंकेचे विकास अधिकारी अभिजित भोसले व येथील शाखाप्रमुख के. ए. जगताप, रोहित घोरपडे यांनी क्षारपड क्षेत्राची पाहणी केली आहे.शेतकऱ्यांच्या मागणीचा अहवाल वरिष्ठांकडे दिल्यानंतर तत्काळ अंमलबजावणी झाल्याने क्षारपड जमीन सुधारणा धोरण राबवल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे.
- 1 of 1090
- ››