Agriculture news in marathi Improve the weight of sugar mills, demanded by 'Andolan Ankush' | Agrowon

साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘आंदोलन अंकुश’तर्फे मागणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत तातडीने सुधारणा करा, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन त्यांनी वजन काटे विभागाचे सहायक नियंत्रक डी. पी. पवार यांना  दिले.

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत तातडीने सुधारणा करा, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन त्यांनी वजन काटे विभागाचे सहायक नियंत्रक डी. पी. पवार यांना  दिले.

निवेदनानुसार, ऊस हंगाम काही दिवसांत सुरु होईल. आपल्या विभागामार्फत साखर कारखान्यांच्या वजन काट्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याचे बहुदा सुरु झाले असेल. भरलेले वाहन कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर त्याचे तात्काळ वजन करून मगच नंबरला लावावे. भरलेल्या वाहनाचे वजन करून त्याची वजनस्लिप, ऑटो जनरेटेड वेईन्ग मशीनवरील पावती, वाहन धारकाकडे (मालकाकडे) देण्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत येण्यास मज्जाव केला जातो. त्याबाबतीत काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी. 

वजनकाट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी (तसा फलक असावा).
शेतकऱ्याला वजनाबाबत तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी, त्याची माहिती देणारा फलक काट्याशेजारी उभारावा. बाहेरच्या काट्यावर शेतकऱ्याने वजनाच्या खात्री साठी वजन केल्यास कारखाना, असे वाहन नाकारतो. त्याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात.  

ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे हे इलेक्ट्रॉनिक व ऑटो जनरेटेड असावेत, असे निर्देश आहेत. त्यामुळे वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप असता कामा नये, याबाबतीत खात्री करून व अट घालून साखर कारखान्यांना वैधता प्रमाणपत्र द्यावे. साखर कारखाने हे भरलेल्या वाहनांची पावती काढत नाहीत, वाहन रिकामे होऊन आलेनंतर वजावट करून पावती वाहन चालकाकडे देतात, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी धनाजी चूडमुंगे. श्रीकांत माने, आप्पा कदम उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...