अधिग्रहित विहिरींसाठी सुधारित मोबदला

अधिग्रहित विहिरींसाठी सुधारित मोबदला
अधिग्रहित विहिरींसाठी सुधारित मोबदला

सोलापूर : सध्या पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहीर व विंधन विहीर अधिग्रहण करण्याचे काम सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. अधिग्रहित केलेल्या खासगी विहिरी व विंधन विहिरीसाठी सुधारित दराने मोबदला देण्याचा निर्णय राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. 

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ अधिग्रहित केलेल्या खासगी विहिरी व विंधन विहिरीच्या मोबदल्याचे दर सुधारित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अधिग्रहित पाण्याच्या स्रोतांमधून टॅंकर भरण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याकरिता १२ रुपये प्रतिहजार लिटर असा दर दिला जात आहे. 

या दराने होणारी रक्कम अथवा सुधारित करण्यात आलेली रक्कम साडेचारशे रुपये (पाणी उचलण्यासाठी साधन-सामुग्री शिवाय) व सहाशे रुपये (पाणी उचलण्यासाठी साधनसामग्रीसह) यातील जास्तीत जास्त असलेली रक्कम ही विंधन विहीरधारकास देण्याची परवानगी पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे ज्या गावात शेतकऱ्यांच्या खासगी विहिरी वा विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे.

जिल्ह्यात १३९ विहिरी व बोअर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. राज्यात ही संख्या काही हजाराच्या घरात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com