agriculture news in marathi Improved environmental protection for animal, human health | Agrowon

प्राणी, मानवी आरोग्यासाठी सुधारित पर्यावरण संरक्षण

डॉ.व्यंकटराव घोरपडे
शनिवार, 25 एप्रिल 2020

जगभरातील पशुवैद्यकीय संस्था आणि पशुवैद्यक मानवी तसेच पशूंच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी आपली सेवा बजावत आहेत. येणाऱ्या काळात प्राणिजन्य आजाराबाबत जगभरात विविध पातळीवर संशोधन होत आहे. त्यामध्ये पशुवैद्यकांचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे.
 

जगभरातील पशुवैद्यकीय संस्था आणि पशुवैद्यक मानवी तसेच पशूंच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी आपली सेवा बजावत आहेत. येणाऱ्या काळात प्राणिजन्य आजाराबाबत जगभरात विविध पातळीवर संशोधन होत आहे. त्यामध्ये पशुवैद्यकांचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जागतिक पशुवैद्यक संघटनेकडून जागतिक पशुवैद्यक दिन साजरा केला जातो. पशुवैद्यकाचे प्राणी आणि समाजाच्या आरोग्यासाठी केलेले योगदान साजरा करण्याची संधी या निमित्ताने सर्वांना मिळत असते. यावर्षीसाठी 'प्राणी आणि मानवी आरोग्यासाठी सुधारित पर्यावरण संरक्षण' हे घोषवाक्य आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमध्ये पशुवैद्यकांचे स्थान देखील महत्त्वाचे आहे. जगभरातील पशुवैद्यकीय संस्था आणि पशुवैद्यक मानवी तसेच पशूंच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी आपली सेवा बजावत आहेत. येणाऱ्या काळात प्राणिजन्य आजाराबाबत जगभरात विविध पातळीवर संशोधन होत आहे. त्यामध्ये पशुवैद्यकांचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे.

  • मानवी आरोग्याशी पशुवैद्यकांचा जवळून संबंध आहे. प्राणिजन्य उत्पादने दूध,मांस, अंडी यांचे आरोग्यदायी उत्पादन होण्यासाठी पशुवैद्यकांचा मोठा सहभाग आहे. अन्न व भेसळ विभागापासून गुणवत्ता तपासणी विभागासह दूध संकलन उपपदार्थ निर्मितीपर्यंत पशुवैद्यक गरजेचा आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये तरुणांना संधी आहे.
  • साथीच्या रोग नियंत्रणामध्ये पशुवैद्यकांच्या अनुभव खूप मोठा असतो. हवामान बदलानुसार जनावरातील साथीच्या रोगाचे नियंत्रण पशुवैद्यक करत असतात. यासाठी 'साथरोग नियंत्रण' हा विषय विशेष करून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवला जातो आणि त्याला प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची संधी देखील मिळत असते. म्हणूनच आज जागतिक स्तरावर कोरोना नियंत्रणासाठी बऱ्याच देशातील तज्ज्ञ पशुवैद्यकीय विभागाशी सल्लामसलत करताना दिसतात.
  • येत्या काळात सर्वांनाच 'आजारापेक्षा प्रतिबंध बरा' या उक्तीप्रमाणे काम करावे लागणार आहे. 'प्राणी आणि मानवी आरोग्य संरक्षणासाठी सुधारित पर्यावरण' याबाबत देखील विचार विनिमय जगात सुरू आहे. वाढत्या तापमानानुसार बदलणारे ऋतू म्हणजे पावसाळ्यातील अतिवृष्टी, महापूर, गारपीट, वाढणारी थंडी, बर्फवृष्टी आणि वितळणारे हिमखंड हे सर्व अडचणीचे ठरत आहेत.या पर्यावरण बदलाचा जनावरांच्यावर खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे.
  • महापूर, दुष्काळाबाबत ठोस कृती कार्यक्रम हाती घेऊन तो राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी जैवविविधता टिकवणे, चांगल्या प्रतीच्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक करणे, उच्च प्रतीच्या पशुवैद्यकीय सेवा सुविधा पुरवणे,उपयुक्त जनावरांच्या उच्च वंशावळीची निर्माण करणे, त्यांच्याकडून उत्पादित उत्पादनाची विपणन व्यवस्था मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे.

वाढत्या तापमानात पशुपालकांनी पशुधनाच्या व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापर करून देखील पर्यावरण बदलावर आपल्याला मात करता येऊ शकेल. मिथेन गॅस उत्सर्जन करणाऱ्या जनुकांमध्ये बदल करून कमी मिथेन गॅस उत्सर्जन करणाऱ्या पशुधनाची निर्मिती केल्यास फार मोठा फायदा होणार आहे. तसे संशोधन ऑस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठ तसेच इटली, इस्राईल येथील विद्यापिठामध्ये सुरू आहे. एकंदर जगातील प्रत्येक देशाने फक्त मानवजातीचा विकास डोळ्यासमोर ठेवून वाटचाल न करता सर्वांगीण विचार केला तर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण बदलावर मात करता येईल. त्यातून चांगल्या गुणवत्तेचे पशूधन तयार करून पूरक उद्योगही शाश्वत उत्पन्न देणारा ठरेल,यात शंका नाही.

जैवविविधतेवर परिणाम
बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या जनावरांच्या क्षमतेपेक्षा पर्यावरण बदल हे वेगाने होत आहेत. त्यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यांच्या उत्पादनावरदेखील परिणाम होताना दिसतो. आपल्या देशातील पशूपक्षांमध्ये जी जैवविविधता आढळते ती त्या भागातील निसर्गानुरुप आहे. प्रत्येक प्रजातीची गुणवैशिष्ट्ये ही त्या प्रदेशातील भौगोलिक, पर्यावरण पूरक आणि पोषक असतात. यानुसार पशुधनाची शारीरिक रचना, गुणवैशिष्ट्ये आपल्याला आढळून येतात. त्याचा फायदा स्थानिक पशुपालकांना झाला आहे. त्यामुळे ही जैवविविधता टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

संपर्क- डॉ.व्यंकटराव घोरपडे
(लेखक सेवानिवृत्त सहाय्यक पशूसंवर्धन आयुक्त आहेत)


इतर कृषिपूरक
घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादनघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच...
संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचेस्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...