Agriculture news in marathi Improved labor work reducing tools | Agrowon

श्रम कमी करणारी सुधारित अवजारे

सौ. रोहिणी भरड, डॉ. सौरभ शर्मा
शुक्रवार, 31 जुलै 2020

महिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित अवजारे विकसित करण्यात आली आहेत. या अवजारांचा वापर केल्याने महिलांमधील शारीरिक ताण कमी होतात आणि कामाची गती वाढते.
 

महिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित अवजारे विकसित करण्यात आली आहेत. या अवजारांचा वापर केल्याने महिलांमधील शारीरिक ताण कमी होतात आणि कामाची गती वाढते.

जमीन मशागतीपासून ते पीक उत्पादन निघेपर्यंतच्या कामात महिलांचा सहभाग असतो. शेती काम करणाऱ्या महिलांना गुडघे दुखी, पाठीच्या मणक्याचे आजार, त्याच बरोबर हातांना जखमा होणे, त्वचेवर खाज सुटणे असे त्रास उद्भवतात. हे लक्षात घेऊन शेतीकामासाठी सुधारित अवजारे विकसित करण्यात आली आहेत. या अवजारांचा वापर केल्याने महिलांचा शारीरिक ताण कमी होतात. ही अवजारे वापरण्यास सोपी आहेत.

भाजी तोडण्यासाठी जनाई मोजे

 • पारंपरिक पद्धतीने भाजी तोडताना हाताला काटे टोचणे, खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, जखमा होणे असे त्रास उद्भवतात. हा त्रास कमी व्हावा त्यासाठी महिला उपाय म्हणून बाजारातील रबरी हात मोजे वापरतात किंवा हाताला कपडा गुंडाळतात. परंतु यामुळे हाताला घाम येतो. हाताचे पूर्ण संरक्षण होत नाही.
 • यावर उपाय म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन विभागाने जनाई मोजे विकसित केले आहेत. या मोजामुळे हाताचे संरक्षण होते.
 • या मोज्यामुळे हातांना काटे टोचत नाहीत. बेल्टला वेलक्रोव्हच्या सोयीमुळे मोजा कोणाच्याही हाताला व्यवस्थित बसतो व कामाची कार्यक्षमता वाढते.
 • हा मोजा वांगी, भेंडी, गवार, तसेच सोयाबीन कापणी व मळणीसाठी उपयोगी आहे.

शेवगा काढणी अवजार 

 • पारंपरिक पद्धतीत शेवगा काढण्यासाठी बांबूला आकडा लावून किंवा बांबूने मारून शेवग्याच्या शेंगांची काढणी केली जाते. यामुळे शेंगांना इजा होते तसेच अपरिपक्व शेंगाही खाली पडतात. पारंपरिक पद्धतीने एका तासात साधारण ८-१० किलो शेंगा काढणे शक्य होते. त्यामुळे शेवगा काढणी यंत्र विकसित करण्यात आले आहे.
 • शेवगा काढण्याचे यंत्र महिलांना वापरण्यास आणि वाहतुकीस सोपे आहे. या यंत्राच्या साह्याने हे एका तासात ३० किलो शेंगा काढता येतात. तसेच अपरिपक्व शेंगा व फुले पडत नाहीत.

भेंडी कात्री

 • भेंडी काढणी जरी सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय त्रासदायक आहे. भेंडीवर असणाऱ्या बारीक लवमुळे हातांना खाज येते. तळहात आणि बोटांना इजाही होते.
 • हे टाळण्यासाठी भेंडी कात्री विकसित करण्यात आली आहे. या कात्रीला दोन रिंग आहेत. त्यातील एका रिंग मध्ये अंगठा व दुसऱ्या रिंगमध्ये शेजारचे बोट घालून थोडे दाबून भेंडी तोडली जाते. या कात्रीने एका तासात ५-१० किलो भेंडी सहज काढणे शक्य होते.

वैभव विळा

 • गवत,ज्वारी,गहू इत्यादी पिकांच्या कापणीसाठी वैभव विळा विकसित करण्यात आला आहे.
 • पारंपरिक विळ्याने १ एकर कापणीसाठी ५० ते ७५ मनुष्य तास लागतात.
 • वैभव विळ्याच्या साहाय्याने १ तासात एका गुंठ्याची कापणी करता येते. हा विळा वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असल्याने कापणी अगदी सहज होते.
 • विळ्याचे पाते हे दातेरी असल्यामुळे याला धार लावावी लागत नाही.

सायकल कोळपे

 • खुरप्याच्या साह्याने अवघडलेल्या स्थितीत बसून खुरपणी केल्यामुळे गुडघे व पाठ दुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी सायकल कोळपे विकसित करण्यात आले.
 • कोळप्याचा उपयोग १५ सें.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी, खुरपणी करण्याकरिता होतो. ५ ते ७ सें.मी. पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते. एक महिला दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी, खुरपणी सहज करू शकते.
 • कोळपे वापरण्यास अत्यंत सोपे व वजनाने हलके असल्याने वाहतुकीस सुलभ आहे. या यंत्रामुळे शारीरिक कष्ट कमी होऊन रोजगार निर्मिती होते.

संपर्क- सौ. रोहिणी भरड, ८१४९८२६०१३
( कृषि विज्ञान केंद्र बीड-१, अंबाजोगाई, जि. बीड)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...
न रडवणारा गोड कांदा!कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...
निर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...
तापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...