Agriculture news in marathi Improved varieties for sweet potato cultivation | Agrowon

रताळे लागवडीसाठी सुधारित जाती

डॉ. संकेत मोरे, डॉ. नम्रता गिरी
गुरुवार, 9 जुलै 2020

रताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे पीक आहे. रताळ्याची बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता सुधारित पद्धतीने लागवड आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची निवड महत्त्वाची आहे.
 

रताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे पीक आहे. रताळ्याची बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता सुधारित पद्धतीने लागवड आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची निवड महत्त्वाची आहे.

रताळे पिकाची लागवड साधारणपणे मे ते जुलै या कालावधीमध्ये केली जाते. जेथे पाण्याची चांगली उपलब्धता आहे तेथे ऑक्टोबर- नोव्हेंबर आणि उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. लागवडीसाठी कंद किंवा वेल यांचा वापर केला जातो. प्राथमिक व दुय्यम रोपवाटिकेमध्ये कंदाचा लागवडीसाठी उपयोग करावा.

प्राथमिक रोपवाटिका

  • लागवडीच्या तीन महिन्याच्यांअगोदर प्राथमिक रोपवाटिकेची तयारी करावी. एक हेक्‍टरवर लागवडीसाठी १०० वर्गमीटर एवढी जागा लागते.
  • लागवडीसाठी १०० ते १५० ग्रॅम वजनाचे निरोगी कंद निवडावेत. लागवड ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.
  • लागवडीच्यावेळी रोपवाटिकेत १.५ कि.ग्रॅ. युरिया मिसळावा. गरजेनुसार पाणी द्यावे.
  • दुय्यम रोपवाटिकेसाठी ४५ दिवसांच्या लागवडीनंतर वेलाचे २० ते ३० सें.मी. तुकडे घ्यावेत. लागवडीसाठी फक्त वेलाच्या शेंडाचे तुकडे घ्यावेत.

दुय्यम रोपवाटिका

  • या रोपवाटिकेमध्ये तुकड्यांची ६०x३० सें.मी.अंतरावर लागवड करावी. १५ व ३० दिवसानंतर रोपवाटिकेत ५ किलो युरियाचा मात्रा द्यावी.
  • लागवडीच्या ३० ते ४५ दिवसांनंतर शेंडा व वेलींच्या मधल्या भागातून २०-३० सें.मी. लांब वेल कापावेत. दुय्यम नर्सरीसाठी ५०० मीटर वर्ग इतकी जागा लागते.
  • जर लागवड कंदापासून न करता वेलीतून केली तर प्राथमिक रोपवाटिका वगळून दुय्यम रोपवाटिकेचा वापर करावा.

वेलींची निवड
लागवडीकरिता शेंड्यांचा भाग निवडावा. वेल मोठी असल्यास शेंडा व मधल्या भागातून वेल निवडावी. शक्यतो २० ते ३० सें.मी. लांबीचे वेल निवडावेत. लागवडीपूर्वी कापलेल्या वेलांचे बंडल बांधून सावलीच्या ठिकाणी २ दिवसांपर्यंत ठेवता येते.

लागवड

  • लागवडीपूर्वी जमीन भुसभुशीत करून घ्यावी. त्यामुळे कंदांची चांगली वाढ होते.
  • लागवडीचे अंतर ६० बाय ३० सें.मी. सें.मी. ठेवावे.
  • लागवड करताना वेल सरळ लावावी. साधारणपणे २ ते ३ कोंब जमिनीच्या आत लावून वरून माती टाकावी. शक्यतो वेलीचे २ ते ३ कोंब जमिनीवर असावेत.

खत व्यवस्थापन 
लागवडीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. या पिकाला हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश लागते. लागवडीच्यावेळी अर्धा किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परिक्षणानुसारच द्यावी.

पीक व्यवस्थापन 
पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पहिल्या टप्प्यात तण नियंत्रण करावे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते.

संपर्क - डॉ. संकेत मोरे, ९६०१२६६६३६
( केंद्रीय कंद पिके संशोधन संस्था, त्रिवेंद्रम, केरळ)


फोटो गॅलरी

इतर कंद पिके
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
..या आहेत कसावा पिकाच्या सुधारित जातीकेंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९...
हळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...
तंत्र अळू लागवडीचेअळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
सुधारित शाबूकंदामुळे कमी होतील लोह,...जनुकीय सुधारणेच्या माध्यमातून शाबूकंदामध्ये...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
बटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्रबटाटा पिकाच्या वाढीसाठी योग्य तापमानाची आवश्यकता...
भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...
आरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...
कांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...
बटाटा पीक सल्लासद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या...
रताळी लागवडीविषयी माहिती द्यावी. रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व...
शास्त्रीय पद्धतीने करा हळदीची काढणीसध्या हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जातीपरत्वे...
फळपिकांमध्ये कंदपिकांची लागवडफळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य ...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
बिटपासून अारोग्यदायी जेलीबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड...