Agriculture news in marathi Improvement of banana prices in Khandesh | Agrowon

 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली असून, कमी दर्जाच्या केळीचे दर ५०० ते ६०० रुपये, असे आहेत. मध्यंतरी किमान दर ३०० ते ४०० रुपये, असे होते.

जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली असून, कमी दर्जाच्या केळीचे दर ५०० ते ६०० रुपये, असे आहेत. मध्यंतरी किमान दर ३०० ते ४०० रुपये, असे होते. यातच कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे चोपडा, जळगाव भागात नवती केळीचे दर जाहीर करावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, रवींद्र निकम आदींनी केली आहे. 

चोपडा, जळगाव व लगतच्या भागात कांदेबाग केळी अधिक असते. परंतु या केळीची काढणी गेल्या महिन्यातच पूर्ण झाली आहे. सध्या आगाप लागवडीच्या नवती केळी बागांमध्ये काढणी सुरू आहे. चोपडा, जळगाव भागात दर्जेदार नवती केळी आहे. अनेक शेतकऱ्यांनी उतिसंवर्धित रोपांची लागवड केली. फर्टीगेशन तंत्र अवलंबले. परंतु या शेतकऱ्यांच्या केळीची काढणी कांदेबाग केळीच्या दरातच केली जात आहे.

मकर संक्रांतीनंतर चोपडा, जळगाव भागातील केळीची नवती केळी दरात काढणी करण्याची मागणी शेतकरी कृती समिती व इतर शेतकऱ्यांनी केली होती. परंतु या मागणीची दखल प्रशासन, व्यापारी, दर जाहीर करणाऱ्या यंत्रणेने घेतलेली नाही. बाजार समित्या केळीचे दर जाहीर करतात. सध्या रावेर भागात नवती केळीला १ हजार ९० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर पिलबाग केळीला १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. या दरात चोपडा, जळगाव भागातही काढणी करावी व कटती बंद करण्याचा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यातच किमान केळी दरात सुधारणा झाल्याने त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना होणार आहे. 
 


इतर बाजारभाव बातम्या
नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने...नगरः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने...
पुण्यात काकडी, लिंबाच्या दरांत सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची सरासरी २३००...औरंगाबाद : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
अकोल्यात शनिवार, रविवारी भाजीपाला...अकोला ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात...
खानदेशात कांद्याच्या दरातील घसरण सुरूचजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या...
राज्यात कलिंगड २०० ते १००० रुपयेजळगावात क्विंटलला ४०० ते ७०० रुपये दर जळगाव ः...
औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये हरभरा...लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व लातूर या...
नगरला शेवगा, वांग्यांचे दर टिकून;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा;...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये कैरी खातेय भाव;...औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात...सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात...
औरंगाबादेत बटाटा सरासरी ८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात काकडी, फ्लॉवरच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...