agriculture news in Marathi, Improvement in banana rate in Jalgaon market | Agrowon

जळगाव बाजारात केळी दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार नवती केळीच्या आवकेत वाढ झाली आहे. उठाव बऱ्यापैकी असल्याने दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ८१ रुपयांनी वाढ झाली आहे. दर प्रतिक्विंटल १०८१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर व जामनेरात मिळून प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार नवती केळीच्या आवकेत वाढ झाली आहे. उठाव बऱ्यापैकी असल्याने दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ८१ रुपयांनी वाढ झाली आहे. दर प्रतिक्विंटल १०८१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर व जामनेरात मिळून प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. 

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीच्या लिलावांना प्रतिसाद मिळत असून, तेथे मागील दोन-तीन दिवस जाहीर लिलावात केळीला प्रतिक्विंटल १३११ रुपयांपर्यंतचे कमाल तर किमान ८०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. बऱ्हाणपूर भागातील नाचणखेडा, बहादरपूर, लोणी भागातही नवती केळीची काढणी सध्या वेगात सुरू आहे. तेथून बॉक्‍समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. दिल्ली येथील व्यापारी बऱ्हाणपुरातून अधिकची केळी मागवून घेत आहेत. कारण, मागील १०-१२ दिवसांपासून दिल्ली येथील बाजारपेठेत आंध्र प्रदेश व नजीकच्या भागातून होणारा केळीचा पुरवठा कमी झाला आहे. 

आंध्र प्रदेशातील केळी कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटल दरात दिल्लीच्या बाजारपेठेत उपलब्ध होत होती. परंतु, तेथील केळीची काढणी जवळपास आटोपल्याने दिल्ली येथील व्यापाऱ्यांनी केळीसाठी बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर भागांत धाव घेतली आहे. बऱ्हाणपूर येथील बाजारात मागील पाच-सहा दिवसांपासून २१० ट्रक केळीची आवक होत आहे. आवकेत तेथेही वाढ झाली आहे. परंतु, उठाव असल्याने दरात तेथेही सुधारणा झाली आहे. पंजाब, काश्‍मिरातील काही मोठ्या खरेदीदारांनी बऱ्हाणपूर व रावेरातील एजंटच्या माध्यमातून थेट रेफर व्हॅनमधून केळीचा पुरवठा करून घेण्यासही सुरवात केली आहे. 

चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत आवक कमी आहे. कारण, कांदेबाग केळीची काढणी जवळपास आटोपली आहे. नवती केळी जळगाव, चोपड्यात अपवादानेच आहे. जामनेरातून पाठवणूक ठाणे, कल्याण, पुणे भागांत होत असल्याची माहिती मिळाली. पिलबाग केळी रावेर, मुक्ताईनगर व यावल भागांत उपलब्ध होत असून, या केळीसही ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

मका, बाजरीचे दर २१०० पर्यंत
खानदेशातील दोंडाईचा, शिरपूर (जि. धुळे), शहादा (जि. नंदुरबार), जळगाव जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, अमळनेर, मुक्ताईनगर येथील बाजारात मक्‍याची आवक अजूनही वाढलेली नाही. पाचोरा, अमळनेर, चोपडा व जळगाव बाजार समितीत मिळून प्रतिदिन ५०० क्विंटलपर्यंतच आवक होत असून, दर २१०० रुपये आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...