Agriculture news in Marathi, Improvement in banana rate in Jalgaon market | Agrowon

जळगाव बाजारात केळी दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जुलै 2019

जळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली असून, उत्तर भारतासह राज्यातून केळीची मागणी वाढली आहे. नवती केळीचे दर रविवारी (ता. ७) ११८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. 

जळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली असून, उत्तर भारतासह राज्यातून केळीची मागणी वाढली आहे. नवती केळीचे दर रविवारी (ता. ७) ११८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. 

केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा या भागात वाढली आहे. आवक वाढत असतानाच मागणीदेखील बऱ्यापैकी असून, सावदा (ता. रावेर), फैजपूर (ता. यावल) येथून उत्तर भारतातील पंजाब, काश्‍मी‍र, दिल्ली, उत्तर प्रदेशात मागील आठ दिवसांत सरासरी प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक झाली. दिल्ली व पंजाबमधून केळीला उठाव वाढल्याने दरांवरील दबाव दूर झाला. केळी दर जूनच्या सुरवातीला १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते; तर जळगाव, पाचोरा, यावल भागात अनेक शेतकऱ्यांच्या केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदीचे प्रकारही सुरू होते. 

सध्या यावल, रावेर, मुक्ताईनगरातून मिळून ३५० ट्रक केळीची आवक होत आहे. या भागात मागील ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळीची काढणी वेगात सुरू आहे. केळीची आवकही वाढत असल्याचे सांगण्यात आले. जळगावलगत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला जाहीर लिलावात बऱ्यापैकी दर मिळत असून, रविवारी कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीला तेथे मिळाले. तेथेही जूनच्या सुरवातीला केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. दर बऱ्यापैकी मिळत असल्याने मुक्ताईनगर व रावेरमधील काही केळी उत्पादक आपली केळी विक्रीसाठी बऱ्हाणपूर येथे पाठवित आहेत. 

केळीची परराज्यांत जशी मागणी आहे, तशी राज्यातील ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह राजस्थान, छत्तीसगडमधूनही केळीला उठाव आहे. पावसामुळे उष्णता बऱ्यापैकी कमी झाल्याने केळीचा दर्जाही सुधारल्याने स्थानिक क्षेत्रातसह छत्तीसगड, राजस्थानमधील केळी पिकवणी केंद्रचालकही केळीच्या खरेदीसंबंधी रावेरात आगाऊ नोंदणी करून घेत असल्याचे सांगण्यात आले.

इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...
सोलापुरात हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...