परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस दरात सुधारणा

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस दरात सुधारणा
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस दरात सुधारणा

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून कापूस खरेदी दरामध्ये सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटलचे दर सहा हजार रुपयांच्या वर गेले आहेत. मंगळवारी (ता. २६) परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ हजार क्विंटल कापसाची आवक होती. तर प्रतिक्विंटलचे दर ५४०० ते ६०५० रुपये होते, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजार समित्यातील कापूस खरेदीवर परिणाम झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी फरदडची आवक सुरू झाल्यामुळे कपाशीचे दर पाच हजार रुपयांपेक्षा कमी झाले होते. परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील परभणी, मानवत, सेलू, बोरी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कापूस खरेदी दरामध्ये सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 

अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दराच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला होता. या शेतकऱ्यांचा फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांनी फरडद कपाशीचे उत्पादन घेतले आहे. दर वधारल्यामुळे कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १९) कापसाची २५०० क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल ५३०० ते ५९०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २०) १८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५४०० ते ५९०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २५) १९०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५४७५ ते ६००० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २६) ३००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५४०० ते ६०५० रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात आजवर १ लाख १३ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, असे बाजार समितीचे सचिव विलास मस्के यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com