काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणा

काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणा
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणा

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. वाढता उन्हाळा आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतीमालाचे उत्पादन घटल्याने विविध शेतीमालाच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये प्रामुख्याने काकडी, दोडका आणि कारली यांचा समावेश आहे.

आवकेत परराज्यांमधून आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून १४ ते १५ टेंपो हिरवी मिरची, बेंगलोर येथून ४ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेंपो शेवगा, राजस्थान येथून ८ ट्रक गाजर, हिमाचल प्रदेश येथून १० ट्रक मटार, कर्नाटकमधून २ टेम्पो घेवडा, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसूण सुमारे ५ हजार गोणी आवक झाली.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले  सुमारे १ हजार पोती, टॉमेटोे ७ हजार क्रेट, फ्लॉवर १० टेंपो, कोबी १४ ते १५ टेंपो, गवार ३ ते ४ टेंपो, भेंडी ७ ते ८ टेंपो, ढोबळी मिरची १० ते १२ टेंपो, शेवगा २ ते ३ टेंपो, भुईमूग ४० ते ५० पोती, तांबडा भोपळा १० ते १२ टेंपो, हिरवी मिरची ३ ते ४ टेंपो, गाजर १५० गोणी, पावटा ५ ते ६ टेंपो, कांदा सुमारे १५० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाट्याची ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : ७०-१५०, बटाटा : १२०-१८०, लसूण : १५०-२००, आले : ५५०-६५०, भेंडी : २५०-३५०, गवार : ३००-४००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : १५०-२००, काकडी : १५०-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ४०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १६०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी १५०-१६०, जाड : ७०-८०, शेवगा : ४००-५००, गाजर : १००-२००, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१५०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ४००-४५०, पावटा : ३००-४००, मटार : ६००-६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे २ लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००,  मेथी : ५००-८००, शेपू : ६००-८००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ७००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-७००.

फळबाजार रविवारी (ता. १८) येथील फळबाजारात मोसंबी १०० टन, संत्री २० टन, डाळिंब २०० टन, पपई २० ते २२ टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिकू २ हजार गोणी आणि बॉक्स, पेरू सुमारे ६०० क्रेटस्, कलिंगड २५ ते ३० टेंपो, खरबूज १० ते १५ टेंपो, सफरचंद ५ ते ६ हजार पेटी, विविध जातींची बोरे सुमारे १ हजार गोणी, सीताफळ ८ टन आवक झाली होती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-५००, मोसंबी : (३ डझन) : १४०-१६०, (४ डझन ) : ६०-१३०, संत्रा : ( ३ डझन) १००-२५०, (४ डझन) : ६०-१२०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२०, पपई  : ५-२०, चिकू : २००-४००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : २०-१५०, सफरचंद - सिमला (२५ किलो) १२००-१८००, किन्नोर : (२५ ते २६ किलो) २२००-३०००, काश्मीर डेलिशिअस : (१५ ते १६ किलो) ७००-१२००, बोरे : चेकनट (१० किलो) ४५०-५००, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो) १४०-१६०, चण्यामण्या ३५०-४००.

फूलबाजार फूलबाजारात आवक साधारण, तर दर स्थिर होते. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-१५, गुलछडी : ३०-१००, बिजली : २०-४०, कापरी : १०-४०, शेवंती ३०-८०, ऑस्टर : १०-२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-३०, गुलछडी काडी : २०-१००, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लिलिबंडल : ८-१२, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०-१००, चमेली : ३००-४००.

मासळी गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. १८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, नदीची सुमारे ८०० किलो, खाडीची ३०० किलो तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ६ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४०० मोठे : १४००-१५००, मध्यम : ८००-९००, लहान : ६००-७००, भिला : ४८०-५५०, हलवा : ४८०, सुरमई : ४८०-५५०, रावस-लहान : ४८०-५५०, मोठे ५५०-६००, घोळ : ४८०, करली : २८०, करंदी (सोललेली) : २८०, भिंग : २४०, पाला : ६००-१२००, वाम : ४८०-५५०, ओले बोंबील : ८०-१२०. कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स :१४००, किंगप्रॉन्स : ५५०, लॉबस्टर :१४००, मोरी :२१०- २८०, मांदेली : १००-१२० राणीमासा : १२०-१८०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४४०-४८०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : १६०-२००, नगली : २८० -३२०, तांबोशी : ३६०, पालू : २४०, लेपा : १०० - १२०, शेवटे : २४० बांगडा : लहान १००-१२० मोठा १८०-२००, पेडवी : ६०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १६०, तारली : १२०.

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०-१८०, मरळ : २८०-३६०, शिवडा : १६०, खवली : १६०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४००-४८०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com