agriculture news in marathi Improvement in gram rate in Khandesh | Agrowon

खानदेशात हरभरा दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

जळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर प्रतिक्विंटल ४६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. हरभऱ्याची आवक वाढत आहे.

जळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर प्रतिक्विंटल ४६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. हरभऱ्याची आवक वाढत आहे. दर मध्यंतरी ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, या दरम्यान स्थिर होते. त्यात गेल्या दोन दिवसांत सुधारणा दिसत आहे. 
 

हरभऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा येथील बाजार समिती प्रसिद्ध आहे. काबुली हरभऱ्याची आवक अद्याप सुरू झालेली नाही. परंतु येत्या आठवड्यात काबुली हरभऱ्याची आवकदेखील सुरू होईल. हरभऱ्याची शासकीय खरेदीची तयारीदेखील प्रशासनाने केली आहे. यानंतर दरात सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. चोपडा, अमळनेर व जळगाव येथील बाजारात गेल्या चार दिवसात मिळून प्रतिदिन सरासरी चार हजार क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. 

शिरपूर येथेही गेले तीन दिवस प्रतिदिन एक हजार क्विंटल आवक झाली आहे. शहादा येथेही आवक सुरू आहे. देशी, देशी संकरित वाणांच्या हरभऱ्याचे दर सुरवातीपासून ४२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. त्यात सुधारणा होण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत होते. कारण हरभऱ्याची आवक वाढल्यानंतर किमान दरात घसरण दिसत होती. यातच शासकीय खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. शिवाय मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाल्याची स्थिती आहे. 

मळणी पूर्ण 

देशी, देशी सुधारित प्रकारच्या हरभऱ्याची मळणी अपवाद वगळता खानदेशात पूर्ण झाली आहे. आवक वाढत आहे. गेल्या आठवड्यात शिरपूर, चोपडा येथील बाजारातील आवक प्रतिदिन ४०० क्विंटल, अशी होती. ती दुप्पट झाली आहे.

जळगाव येथील बाजारात औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, जालना भागातूनही आवक सुरू आहे. जळगाव येथे प्रतिदिन ७०० क्विंटल आवक झाली. दर किमान ४२०० रुपये आहे.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...