नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची आवक गत सप्ताहात अवघी १६५ क्विंटल झाली. आवक कमी प्रमाणात होत आहे.
Improvement in green chilli prices in Nashik
Improvement in green chilli prices in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची आवक गत सप्ताहात अवघी १६५ क्विंटल झाली. आवक कमी प्रमाणात होत आहे. परिणामी, उठाव असल्याने दरात सुधारणा असल्याचे पहायला मिळाले. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० दर मिळाला. तर, सरासरी दर ३७५० रुपये राहिला.

सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण राहिली. आवक १७७५ क्विंटल, तर दर १५०० ते ४५००, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ३१३७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३२९० ते ३८००, तर सरासरी दर ३४५० रुपये राहिला. लसणाची आवक ४० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६३०० ते ११५००, तर सरासरी दर ९४५० रुपये राहिला.

फळभाज्यांची आवक सर्वसाधारण असल्याने दरात तेजी कायम आहे. वालपापडी-घेवड्याची आवक ५१९५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १५००, तर सरासरी १२५० रुपये दर राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५००, तर सरासरी दर २००० रुपये राहिला. गाजराची आवक ९१४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४००० तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २०००, तर सरासरी १५०० रूपये दर मिळाला. वांगी २०० ते ४००, तर सरासरी ३०० व फ्लॉवर ४५ ते ८० सरासरी ६० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ४६ ते ३००, तर सरासरी १३५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १०० ते २००, तर सरासरी दर १५० रुपये प्रति ९ किलोस मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com