Agriculture news in marathi Improvement in green chilli prices in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 एप्रिल 2021

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ३१८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ४९०० रुपये तर सरासरी दर ३८०० रुपये मिळाला.

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ३१८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ४९०० रुपये तर सरासरी दर ३८०० रुपये मिळाला. गत सप्ताहात ही आवक ७८३ क्विंटल होती. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते २८०० रुपये तर सरासरी दर २६०० रुपये मिळाला होता. सध्या परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव सुधारणा झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक ६७४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १२०० मिळाला तर सरासरी दर ९५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७९५५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १६०० तर सरासरी दर १२०० रुपये राहिला. लसणाची आवक ८११ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २१५० ते ६५०० तर सरासरी दर ४८०० रुपये राहिला. आद्रकची आवक ४०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २१०० ते २५०० तर सरासरी दर २२०० रुपये राहिला.
सप्ताहात फळभाज्यांची आवक सर्वसाधारण असून दर स्थिर आहेत. वालपापडी-घेवड्याची आवक २१९३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३००० ते ५१०० असा तर सरासरी दर ४००० रुपये राहिला. 

घेवड्याला प्रतिक्विंटल २६०० ते ५४०० तर सरासरी दर ४२०० रुपये राहिला. गाजराची आवक ३००३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १३०० तर सरासरी दर १००० रुपये राहिला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते ३५० तर  सरासरी २००, वांगी १०० ते ३०० तर सरासरी २८० व फ्लॉवर १०० ते ३५० सरासरी २०० रुपये, असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ४० ते ९० तर सरासरी ६० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १५० ते २५० तर सरासरी दर २१० रुपये, असे दर प्रति ९ किलोस मिळाले.
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ८० ते २०० तर सरासरी १५०, कारले ४०० ते ५५० तर सरासरी ५००, गिलके २०० ते ४०० तर सरासरी ३००, भेंडी ३०० ते ५०० तर सरासरी ४०० व दोडका २७५ ते ४५० तर सरासरी दर ३३० रुपये, असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १५० ते ४२५ तर सरासरी ३५० रुपये, असे २० किलोस दर मिळाले.

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ३६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १२५० तर सरासरी दर १००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक १७१८ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते ९००० तर सरासरी ६००० रुपये दर मिळाला. द्राक्षांची आवक ४०६ क्विंटल झाली. थॉमसन वाणास १२०० ते २५०० तर सरासरी २००० रुपये दर मिळाला. तर सोनाका सीडलेस वाणास १२०० ते ३६०० तर सरासरी २५०० रुपये दर मिळाला. आंब्याची आवक २४७ क्विंटल झाली. त्यास १५,००० ते ३०,००० तर सरासरी २५,००० रुपये मिळाला.
 


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...