agriculture news in marathi Improvement in Kabuli gram price in Khandesh | Agrowon

खानदेशात काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

जळगाव  ः  खानदेशात या आठवड्यात बाजार समित्यांमध्ये काबुली हरभऱ्याची आवक ३० ते ३५ टक्के घटली. दरात सुधारणा झाली आहे.

जळगाव  ः  खानदेशात या आठवड्यात बाजार समित्यांमध्ये काबुली हरभऱ्याची आवक ३० ते ३५ टक्के घटली. दरात सुधारणा झाली आहे. दर ८७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. क्विंटलमागे सुमारे १८० ते २२५ रुपयांची सुधारणा झाली आहे. 

काबुली हरभऱ्याची सुमारे साडेसात हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. ही पेरणी जळगावमधील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात झाली होती. यंदा उत्पादन कमी आले आहे. गेल्या वर्षी काबुली हरभऱ्याचे एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन आले होते. यंदा एकरी चार ते साडेचार क्विंटल उत्पादन हाती आले आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाले होते. यामुळे बाजार व्यवस्था कोलमडली व शेतमालाच्या दरावर दबाव वाढला होता. गेल्या वर्षी काबुली हरभऱ्याला जागेवर सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर चोपडा, अमळनेर भागात मिळाला होता. यंदा दर सुरवातीपासून टिकून 
आहे. 

हरभऱ्याला प्रतिक्विंटल साडेआठ हजार रुपये दर सुरवातीला होता. त्यात गेल्या तीन दिवसात क्विंटलमागे १८० ते २२५ रुपयांची सुधारणा झाली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर या बाजार समित्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत.

या बाजार समित्यांमध्ये काबुली हरभऱ्याची आवक ३० ते ३५ टक्के घटली आहे. गेल्या आठवड्यात चोपडा, अमळनेरात मिळून प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल आवक होती. तर या आठवड्यात गेले तीन दिवस प्रतिदिन सरासरी ७५० क्विंटल आवक या बाजारात झाली. 

व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी

शिरपुरातही आवक घटली आहे. परिणामी दरात सुधारणा झाली आहे. या हरभऱ्यास एकच दर मिळत आहे. किमान दर व कमाल दर हा मुद्दाच नाही. या हरभऱ्याचे दर्जेदार उत्पादन चोपडा, शिरपूर भागात घेतले जाते. जागेवर किंवा थेट खेडा खरेदीदेखील शिरपूर  येथील खरेदीदार करीत आहेत. मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या व्यापाऱ्यांकडून या हरभऱ्यास चांगली मागणी आहे, अशी माहिती मिळाली.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...