किमान तापमानात वाढ

किमान तापमानात वाढ
किमान तापमानात वाढ

पुणे ः राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची भूरभूर सोडल्यास ढगाळ हवामान होते. मराठवाडा विदर्भातही काही भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात वाढ होऊन काही अंशी उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा किंचित वाढला आहे. कोकणात कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान १९ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सोलापूर, जळगाव येथे ३२.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. मराठवाड्यातील नांदेड येथे ३३.० अंश सेल्सिअस तापमान होते.   उर्वरित भागात ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात अकोला वगळत उर्वरित भागात २९ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. रविवारी (ता. २९) राज्यातील अनेक भागांत ढगाळ, काही भागांत कडक ऊन पडल्याची स्थिती होती.   गुजरातच्या दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच, उत्तरप्रदेशाच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर ते अमृतसर, बरेली, सुलतानपूर, कलकत्ता या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवार (ता. ३१) ते गुरुवार (ता. २) या दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील मंडणगड येथे ३०, वाल्पोई २०, कणकवली १०, मध्य महाराष्ट्रातील चंदगड, पन्हाळा, राधानगरी येथे १०, तर विदर्भातील गोरेगाव येथे २०, आमगाव, सालेकसा येथे १० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.   रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये  मुंबई ३०.३, सांताक्रुझ ३०.८, अलिबाग ३०.६, रत्नागिरी २९.२, डहाणू ३१.६, पुणे २८.७, जळगाव ३२.४, कोल्हापूर २५.६, महाबळेश्वर १९.६, मालेगाव ३१.४, नाशिक २९.०, सांगली २६.५, सातारा २६.१, सोलापूर ३२.७, उस्मानाबाद ३०.१, औरंगाबाद ३१.०, परभणी ३२.९, नांदेड ३३.०, अकोला ३६.०, अमरावती २९.८, बुलढाणा ३०.६, चंद्रपूर ३२.२, गोंदिया २९.२, नागपूर ३२.१, वर्धा ३१.०, यवतमाळ २९.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com