सोलापुरात भेंडी, वांग्याच्या दरात सुधारणा

Improvement in okra, brinjal rates in Solapur
Improvement in okra, brinjal rates in Solapur

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडी, वांग्यांची आवक तुलनेने कमी राहिली. पण, त्यांचा बाजार पुन्हा एकदा चांगलाच सुधारत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ताज्या बाजारभावासाठी येथे क्लिक करा..

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहा वाग्यांची आवक रोज ३० ते ४० क्विंटल, भेंडीची १० ते १५ क्विंटल इतकी आवक राहिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आवक आणि दरांत सातत्याने तेजी आहे. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातून आहे. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यात तर त्यांच्या दराने चांगलीच उचल खाल्ली. पण, या सप्ताहातही पुन्हा त्यांचे दर वधारलेलेच राहिले. मुळात त्यांना असणारी मागणी आणि आवक यांच्यातील चढ-उतारामुळे तेजीचे हे वातावरण राहिले.

याबरोबरच घेवडा, हिरव्या मिरचीलाही मागणी वाढली. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, हिरव्या मिरचीला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपूचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही स्थानिक भागातून झाली. प्रतिदिन प्रत्येकी १० ते १२ हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. पण, भाज्यांना तुलनेने कमीच उठाव  मिळाला. कोथिंबीर, मेथी आणि शेपूला प्रत्येकी शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर टिकून

कांदा बाजारात गेल्या काही दिवसांत तेजी आहे. या सप्ताहातही कांद्याचे दर काहीसे टिकून राहिले. कांद्याची प्रतिदिन २०० ते २५० गाड्यापर्यंत आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३६०० रुपये आणि सर्वाधिक १२ हजार रुपये असा दर मिळाला. संपूर्ण सप्ताहात ८ ते १२ हजारादरम्यान सर्वाधिक दर मिळत राहिला. पण, सप्ताहाच्या शेवटी शनिवारी (ता. १४) पुन्हा हा दर १४००० रुपयांवर पोचला. मागणी आणि आवकेवरच कांद्याच्या दराचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे दरातील चढ-उतार सातत्याने होत आहे. ताज्या बाजारभावासाठी येथे क्लिक करा..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com