Agriculture news in Marathi, Improvement in onion, ginger, beet rates in Pune | Agrowon

पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली होती. मागणी वाढल्याने कांदा, आले आणि बीटच्या दरात थोडी वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर भिजलेल्या फुलांची आवक जास्त झाल्याने फुलांचे दर वाढले होते.

पुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली होती. मागणी वाढल्याने कांदा, आले आणि बीटच्या दरात थोडी वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर भिजलेल्या फुलांची आवक जास्त झाल्याने फुलांचे दर वाढले होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकमधून ६ ट्रक मटार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून १० ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ६ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ८ टेम्पो, कर्नाटकमधून घेवडा सुमारे ४ आणि पावटा सुमारे ३ टेम्पो, बंगलोर येथून आले एक टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॉवर आणि कोबी प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, फ्लॉवर, भेंडी, कोबी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, तर गवार सुमारे ६ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे ५० गोणी, तसेच कांदा सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा - १२०-१५०, बटाटा- ८०-१३०, लसूण - ५००-९००, आले : सातारी ७००-९००, बंगलोर -७००, भेंडी : २००-२५०, गवार : २५०-४००, टोमॅटो - १८०-२२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १५०-१८०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१२०, पापडी : २४०- २५०, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ८०-१४०, वांगी : १०० -२००, डिंगरी : १५० -१८०, नवलकोल : १२० -१४०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ८०-१००, शेवगा : ४००- ४५०, गाजर : २५०-२८० वालवर : २५०-३००, बीट : २५०-३००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १५० -१६०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ५५० -६००, पावटा : २५०-३००, मटार : परराज्य- ४००- ६००, तांबडा भोपळा ८०-१२०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५०० -८००, मेथी : ४००-६००, शेपू : ४००-६००, कांदापात : १००० -१२००, चाकवत : ५०० -७००, करडई : ५०० -८००, पुदिना : ५०० -६००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ३००-५००, चवळई : ५०० -६००, पालक : ५०० -८००. 

फळबाजार 
रविवारी (ता. ४) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री २ टन, डाळिंब १५० टन, पपई ५ टेम्पो, लिंबे सुमारे दिड ते २ हजार गोणी, चिक्कू ५०० डाग, कलिंगड २ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो, पेरूची सुमारे १५० क्रेट आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-५००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन ) : ४०-१५०, संत्रा : (३ डझन) : १२०-२५०, (डझन ४) : ४०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१२० गणेश ५-४०, आरक्ता १५-५५. कलिंगड : १२-१४, खरबूज : २५-३०, पपई : २०-२५, चिक्कू : २००-७००, पेरु (२० किलो) ६००-९००, 

फुलबाजार 
पावसामुळे आवक झालेल्या फुलांमध्ये ७० टक्के भिजलेल्या फुलांची आवक वाढली होती. मात्र सुक्या फुलांना मागणी असल्याने दर वाढले होते. फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : १००-१५०, बिजली - १२०-१५०, कापरी : ४०-८०, शेवंती - ६०-१२०, आॅस्टर : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ४-१०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिलि बंडल : १६-२० जर्बेरा : १०-४०, कार्नेशियन : ६०-१२०.

मटण मासळी 
श्रावण महिन्यामुळे मासळी, चिकन, मटणाची मागणी घटली असली तरी पावसामुळे पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक बंद आहे. परिणामी विविध मासळींचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. पावसाच्या संततधारेमुळे खाडीच्या मासळीची आवक बंद झाली आहे. यामुळे सौंदाळे, खापी, नगली, पालू, लेपा, शेवटेची आवक झाली नाही. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. ४) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ५ टन, आणि नदीच्या मासळीची सुमारे ५०० किलो आवक झाली होती. तसेच आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ५ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४०० मोठे १४०० मध्यम:८००- ९००, लहान ७००-८००, भिला : ६००, हलवा : ७००-८ ८००, सुरमई : ७००, रावस : लहान ७००, मोठा : ९००, घोळ : ७००, करली ४००, पाला : लहान ७००-८००, मोठा १२००-१४००, वाम : पिवळी लहान ५०० मोठी ७००-८००,  काळी :४००- ४८०, ओले बोंबील : २५०-३६०, कोळंबी ः लहान २४०, मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २४०-२८०, मोठी ४८०, मांदेली : १६०, राणीमासा : २४०-२८०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५५०-६००

खाडीची मासळी : तांबोशी : मोठी- ५००-५५०, बांगडा :  २४०-२८०,, बेळुंजी : १६०-२००, तिसर्या : २००, खुबे १२०, तारली : १६०
नदीची मासळी : रहू :१४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : लहान २८०, मोठे- ४८०, शिवडा : २४०, चिलापी : ८०,  खवली : २४०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ४८०

मटण : बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०.
चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंतकोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 
अंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रति नग : ७ इंग्लिश : शेकडा : ३६५ डझन : ४८ प्रतिनग : ४.


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...