agriculture news in Marathi, Improvement on onion market | Agrowon

कांद्याच्या बाजारभावात सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीला काढण्याची लगबग सुरू आहे. सध्या १५ रुपये किलो बाजारभावाने कांद्याची व्यापारी खरेदी करत आहेत. शेताच्या बांधावर व कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. दुष्काळी परिस्थितीतही जवळपास चार हजार एकर क्षेत्रात कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते. 

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीला काढण्याची लगबग सुरू आहे. सध्या १५ रुपये किलो बाजारभावाने कांद्याची व्यापारी खरेदी करत आहेत. शेताच्या बांधावर व कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. दुष्काळी परिस्थितीतही जवळपास चार हजार एकर क्षेत्रात कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते. 

हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदी, उजवा, डावा कालवा, घोड शाखेला कालवा, घोड नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदी ठिकाणी शाश्‍वत पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच बंधारे व कालव्यांच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले होते. 

चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंब, चांडोली बुद्रुक, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेग आदी गावांतील शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तीन ते चार रुपये किलो बाजारभाव असल्यामुळे शेताच्या बांधावर किंवा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

आंबेगाव तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. एक एकर क्षेत्रात कांद्यांची रोपे, लागवड, खते औषधे, मजुरी असा सरासरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यानंतर सरासरी बारा ते १४ टन कांदा उत्पादन निघते. या वर्षी कांदा पिकाला हवामान अनुकूल ठरल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. 

बाजारभावातील चढ-उतारानुसार एक नंबर गुणवत्तापूर्ण कांद्याला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सरासरी १५ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे साठवणूक केलेले कांदे विक्रीसाठी काढले आहेत, अशी माहिती साकोरे येथील शेतकरी श्‍यामराव विठ्ठल आवटे यांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...