पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात सुधारणा

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३१) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली.
Improvement of onion, potato, ghevda prices in the In Pune
Improvement of onion, potato, ghevda prices in the In Pune

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३१) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते. मात्र कांदा, बटाटा आणि घेवड्याच्या आवकेत घट झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाली.

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून ३ ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ७०० पोती आवक झाली होती. तर कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर १०, सिमला मिरची ७ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, टॉमेटो ७ हजार क्रेट, भुईमूग शेंगा ५० गोणी, तांबडा भोपळा ७ टेम्पो, गावरान कैरी ३ टेम्पो, तर कांदा ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : १५०-२००, बटाटा : १००-१६०, लसूण : ४००-७००, आले : सातारी १५०-२००, भेंडी : २५०-३००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : १५०-१८०, काकडी : १५०-१८०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-८०, वांगी : १००-१२०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १५०- २०० वालवर : ३५०-४००, बीट : ८०-१००, घेवडा : ८००-१०००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३५०-४००, भुईमूग शेंग : ३००-३५०, मटार - ७००-८००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, तोतापुरी कैरी - १५०-२००, गावरान - १००-१५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com