कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा

कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा

नागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा दरात काहीशी सुधारणा झाली. गेल्या आठवड्यात २२०० ते २९०० रुपये क्‍विंटल असलेल्या पांढऱ्या कांद्याचे दर या आठवड्यात २५०० ते ३००० रुपयांवर पोचले. यापुढील काळात कांदा दरात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. 

कळमणा बाजार समितीमधील व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या कांद्याची बाजारातील आवक गेल्या आठवड्यात १००० क्‍विंटलची होती. या आठवड्यात आवक १५०० क्‍विंटलपर्यंत पोचली. तरीही दरातील सुधारणा मात्र थांबत नव्हती. मागणी वाढल्याच्या परिणामी दरातील सुधारणा असल्याचे सांगण्यात आले. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल असलेले कांदा दर २५०० ते ३००० रुपयांवर पोचले होते. लाल कांदा २००० ते २५०० रुपये क्‍विंटल राहिला. लसणाचे दर ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलवरून ८००० ते ११००० रुपयांवर पोचले. लसून दरात आणखी तेजीचा अंदाजही वर्तविला गेला. लसणाची सरासरी आवक ५०० क्‍विंटल आहे. बाजारात टोमॅटोच्या दरातही सुधारणा झाली. 

टोमॅटो १२०० ते १५०० रुपये क्‍विंटल होता. त्यात वाढ होत हे दर १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलवर पोचले. २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलने चवळी शेंगाचे व्यवहार होत आहेत. आवक १२० क्‍विंटलची आहे. १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असलेल्या भेंडीचे दर या आठवड्यात २००० ते २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले. भेंडीची आवक १०० क्‍विंटल आहे. २८०० ते ३२०० रुपये क्‍विंटलने गवार शेंगाचे व्यवहार होत आहेत. तिची आवक १२० क्‍विंटलच्या घरात आहे. हिरव्या मिरचीची आवक १४२ क्‍विंटल, तर दर ३००० ते  ३५०० रुपये क्‍विंटल राहिले. भुईमूग शेंगाची अवघी ६० क्‍विंटलची आवक झाली.

५००० ते ५५०० रुपये क्‍विंटलने शेंगाचे व्यवहार झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कारली २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल आणि आवक १०० क्‍विंटल राहिली. १४०० ते २४०० रुपये क्‍विंटल असलेल्या काकडीचे दर सुधारून १४०० ते १८०० रुपयांवर पोचले. काकडीची आवक १७५ क्‍विंटलची आहे. गाजर, पालकची देखील बाजारात नियमित आवक आहे. 

सोयाबीन, हरभरा आवक बाजारात हरभऱ्याची ४४३ क्‍विंटल आवक; तर दर ३८००० ते ४२८६ रुपये राहिले. सोयाबीनची आवक २६७ क्‍विंटलची होती. सोयाबीन दर ३४०० ते ३६५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com