Agriculture news in marathi, Improvement in onion prices in the calamana market | Page 2 ||| Agrowon

कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

नागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा दरात काहीशी सुधारणा झाली. गेल्या आठवड्यात २२०० ते २९०० रुपये क्‍विंटल असलेल्या पांढऱ्या कांद्याचे दर या आठवड्यात २५०० ते ३००० रुपयांवर पोचले. यापुढील काळात कांदा दरात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा दरात काहीशी सुधारणा झाली. गेल्या आठवड्यात २२०० ते २९०० रुपये क्‍विंटल असलेल्या पांढऱ्या कांद्याचे दर या आठवड्यात २५०० ते ३००० रुपयांवर पोचले. यापुढील काळात कांदा दरात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. 

कळमणा बाजार समितीमधील व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या कांद्याची बाजारातील आवक गेल्या आठवड्यात १००० क्‍विंटलची होती. या आठवड्यात आवक १५०० क्‍विंटलपर्यंत पोचली. तरीही दरातील सुधारणा मात्र थांबत नव्हती. मागणी वाढल्याच्या परिणामी दरातील सुधारणा असल्याचे सांगण्यात आले. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल असलेले कांदा दर २५०० ते ३००० रुपयांवर पोचले होते. लाल कांदा २००० ते २५०० रुपये क्‍विंटल राहिला. लसणाचे दर ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलवरून ८००० ते ११००० रुपयांवर पोचले. लसून दरात आणखी तेजीचा अंदाजही वर्तविला गेला. लसणाची सरासरी आवक ५०० क्‍विंटल आहे. बाजारात टोमॅटोच्या दरातही सुधारणा झाली. 

टोमॅटो १२०० ते १५०० रुपये क्‍विंटल होता. त्यात वाढ होत हे दर १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलवर पोचले. २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलने चवळी शेंगाचे व्यवहार होत आहेत. आवक १२० क्‍विंटलची आहे. १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असलेल्या भेंडीचे दर या आठवड्यात २००० ते २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले. भेंडीची आवक १०० क्‍विंटल आहे. २८०० ते ३२०० रुपये क्‍विंटलने गवार शेंगाचे व्यवहार होत आहेत. तिची आवक १२० क्‍विंटलच्या घरात आहे. हिरव्या मिरचीची आवक १४२ क्‍विंटल, तर दर ३००० ते  ३५०० रुपये क्‍विंटल राहिले. भुईमूग शेंगाची अवघी ६० क्‍विंटलची आवक झाली.

५००० ते ५५०० रुपये क्‍विंटलने शेंगाचे व्यवहार झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कारली २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल आणि आवक १०० क्‍विंटल राहिली. १४०० ते २४०० रुपये क्‍विंटल असलेल्या काकडीचे दर सुधारून १४०० ते १८०० रुपयांवर पोचले. काकडीची आवक १७५ क्‍विंटलची आहे. गाजर, पालकची देखील बाजारात नियमित आवक आहे. 

सोयाबीन, हरभरा आवक
बाजारात हरभऱ्याची ४४३ क्‍विंटल आवक; तर दर ३८००० ते ४२८६ रुपये राहिले. सोयाबीनची आवक २६७ क्‍विंटलची होती. सोयाबीन दर ३४०० ते ३६५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

इतर बाजारभाव बातम्या
मध्यप्रदेशातील पावसाने सोयाबीन दरांत...नागपूर : मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे या...
पुण्यात गवार, टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत चवळी २५०० ते ४००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात घेवडा १००० ते ५००० रुपयेसोलापुरात सर्वाधिक २००० रुपये सोलापूर कृषी...
सांगलीत कांदा १६०० ते ४००० रुपये...सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळे व...
जळगाव जिल्ह्यात केळी दरात सुधारणाजळगाव  ः जिल्ह्यात केळीच्या दरात सुधारणा...
जळगावात गवार २६०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
कळमणाला सोयाबीन ३८०० रुपये प्रतिक्विंटलनागपूर : कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी; तर...
नाशिकला कांद्याची सर्वसाधारण आवक; दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक...
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...