सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणा

सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणा
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणा

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक कमी राहिली. पण या सप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. त्यास प्रतिक्विंटलला सर्वधिक १२०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय काकडी, गाजरालाही चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ५० ते १०० गाड्यापर्यंत राहिली. त्यात सातत्य राहिले. पण आवकेत चढ-उतार राहिला. कांद्याची सर्व आवक ही स्थानिक भागापेक्षा बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या काही दिवसांतील कांदा आवक आणि दराचा विचार करता, कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाल्याचे दिसते. सर्वाधिक ९०० ते १००० रुपयांवर स्थिरावलेला कांदा दर या सप्ताहात १००-२०० रुपयांच्या फरकाने सुधारला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय काकडी, गाजरालाही या सप्ताहात पुन्हा मागणी कायम राहिली.

वांगी आणि टोमॅटोचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवक प्रत्येकी ३० ते ६० क्विंटल प्रतिदिन इतकी राहिली. काकडी आणि गाजराची प्रत्येकी एकेक गाडीपर्यंत आवक राहिली. काकडीला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये, तर गाजराला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर टोमॅटोला किमान ६०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये दर मिळाला.

भाजीपाल्याच्या दरातील सुधारणा कायम  भाजीपाल्याच्या दरातील सुधारणा या सप्ताहातही कायम होती. भाज्यांची आवक साधारण रोज ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. त्यातही कोथिंबीर, मेथी, चुक्‍याला उठाव राहिला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ७०० ते ११०० रुपये, मेथीला ७०० ते १२०० रुपये आणि चुक्‍याला ३०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. शेपूला ३०० ते ५०० रुपये, पालकाला २०० ते ३५० रुपये, असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com