कांदा, काकडी, हिरवी मिरचीच्या भावात सुधारणा

कांदा, काकडी, हिरवी मिरचीच्या भावात सुधारणा
कांदा, काकडी, हिरवी मिरचीच्या भावात सुधारणा

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.३०) सुमारे १४० ते १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्याच्या आवकीत घट झाली. कांदा, काकडी, हिरवी मिरची, शेवग्याच्या भावात १० ते २० टक्के वाढ झाली. इतरही भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ टिकून असल्याचे सांगण्यात आले. 

राज्याच्या विविध भागांतून होणाऱ्या स्थानिक आवकेत सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटोे सुमारे ३ हजार ५०० क्रेट, कोबी ७ ते ८ टेम्पो, तर फ्लॉवर सुमारे १४ ते १५ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो आवक झाली. जुन्या नव्या कांद्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली. 

परराज्यातील आवकेत कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, बंगलोर येथून २ टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, मध्य प्रदेशातून सुमारे २५ ट्रक मटार, गुजरात कर्नाटकातून कोबी ४ ते ५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणींची, तसेच आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ५० ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : जुना २०-५०, नवा ६०-१००, बटाटा : जुना ७०-१००, लसूण : १२०-२००, आले : ५००-६००, भेंडी : ३५०-४००, गवार : ५००-६००, टोमॅटो : १००-१६०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : २००-२२०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : २२०-२७०, पापडी : २००, पडवळ : २००, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ४०-७०, वांगी : १८०-२२०, डिंगरी : १८०-२२०, ढोबळी मिरची : १८०-२२०, तोंडली : केळी २००-२५०, जाड : १५०-२००, शेवगा : ४००, गाजर : ८०-१२०, वालवर : २००-२२०, बीट : १००-१४०, घेवडा : ३००, कोहळा : १००, आर्वी : ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २५०-३००, पावटा : २००-२५०, मटार : परराज्य २००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : १५०-१७०, मका कणीस : ८०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुड्या आवक झाली. आवक घटल्याने कोथिंबिरीच्या भावात शेकडा ४०० रुपयांची वाढ झाली. मेथीची सुमारे ७० हजार जुड्या, तर हरभऱ्याची ७० हजार जुडी आवक झाली.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१६००, मेथी : ४००-६००, शेपू : ५००-७००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ५००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-६००, हरभरा गड्डी : ४००-७००. 

फळबाजार  फळबाजारात रविवारी (ता.३०) मोसंबी सुमारे ५० टन, संत्री २ ट्रक, डाळिंब सुमारे २०० ते २५० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार ५०० गोणी, चिकू एक हजार बॉक्स आणि गोणी, पेरू साडे तीन टन, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे १ हजार २०० गोणी, सीताफळाची २ ते ३, तर द्राक्षांची सुमारे १० टन आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-४००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १६०-३००, (४ डझन ) : १००-१७०, संत्रा : (८ ते १२ डझन) ७००-९००, (१४ ते १६ डझन) : ७००-८००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १५-६०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ४-८, खरबूज : १०-२०, पपई : ३-१२, चिकू : १००-४००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : २०-२००, सफरचंद : सिमला (२५ किलो) १२००-१८००, किन्नोर (२५ ते ३० किलो) २२००-२८००, काश्मीर डेलीशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१३००, महाराजा (१५ ते १६ किलो) ५०० ते ७००, संत्री : किन्नू (१० किलो ) २५०-३५०, बोरे : चेकनट (१० किलो) ३७०-४००, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो) १५०-२००, चण्यामण्या ३५०-४००. द्राक्षे : तास-ए-गणेश (१५ किलो) १०००-१२००, जंम्बो (१० किलो) ७००-१२००, सुपर सोनाका (१५ किलो) १२००-१५००, स्ट्रॉबेरी : १२०-३००.  

फूलबाजार लग्नसराई, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांना मागणी वाढली आहे. यातच दुष्काळजन्य परिस्थिती आणि थंडीचा कडाका वाढल्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाला आहे. मार्केटयार्डातील फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवकत घट आहे. तुलनेत मागणी जास्त असल्याने भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत. लग्नसराई, नववर्षाच्या स्वागतासाठी कार्नेशियन, डच गुलाब जर्बेरा आदी शोभिवंत फुलांना, तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने पूजेसाठी झेंडू, शेवंतीला मागणी आहे.  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-६०, गुलछडी : ६०-१२०, बिजली : ५०-८०, कापरी : ३०-६०, शेवंती ८०-१४०, ऑस्टर : १०-१६, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २०-५०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, लिलिबंडल : ६-१०, जर्बेरा : २०-५०, कार्नेशियन : ८०-१५०.

मासळी बाजार नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रम, पार्ट्यांसाठी तसेच, वाढती थंडीमुळे मागणी वाढल्याने मासळीच्या दरात ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. दरम्यान, गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची १२०० किलो, नदीची सुमारे १००० ते १२०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. थंडी वाढल्याने अंड्याच्या मागणीबरोबर इंग्लिश आणि गावरान अंड्याच्या दरात शेकड्याला दरात २० ते ३० रुपयांनी वाढ झाली. मटण आणि चिकनचे दर तुलनेने स्थिर होते.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे  १६००-१८००, मध्यम : १०००-१२००, लहान : ८००-९००, भिला : ७००, हलवा : ६५०, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६००-६५०, मोठे ७५०-८५०, घोळ : ६५०, करली : ३६०-४००, करंदी  (सोललेली) : ३६०,  भिंग ४००, पाला : लहान ८०० , मोठे :१२००, वाम : लहान ४४० पिवळी मोठे  ६५०,  काळी : ३६०, ओले बोंबील : लहान १२०, मध्यम १६०-१८०

कोळंबी : लहान :३६०, मोठी : ५५०, जंबोप्रॉन्स :१५००, किंगप्रॉन्स : ६५०, लॉबस्टर : १५००, मोरी : लहान  १८० मोठे २८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे ः २००-२८०, चिंबोऱ्या : ५००-६००, 

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी १६०-२००, नगली : लहान २८०-३२० मोठी ४८०- ५२०, तांबोशी ४००-४४०, पालू : २४०, लेपा : लहान १२०, मोठे २००-२४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान १४०, मोठा २००-२४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १८०, तारली : १२०. 

नदीची मासळी : रहू ः १६०, कतला : १८०, मरळ : लहान २८०, मोठी ४८०, शिवडा : २०० चिलापी : ८०, मागूर : १४०, खवली : १६०, आम्ळी : १०० खेकडे : २००, वाम : ५५०. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. 

चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी : गावरान : शेकडा : ७७०, डझन : १०० प्रति नग : ८.५ इंग्लिश : शेकडा : ४८४  डझन : ६६ प्रतिनग : ५.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com