Agriculture news in Marathi Improvement in orange rates in the Kalmana market | Agrowon

कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

नागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी बाजारात संत्रा फळांनाही मागणी वाढली आहे. संत्रा मागणीवाढीत कोरोनाचा प्रभावही अनुभवला जात आहे. त्यामुळे संत्रा दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात संत्रा दर ६०० ते १६०० रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात संत्र्याचे दर ६०० ते २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. येत्या काळात चांगल्या प्रतीच्या संत्रा दरात सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

नागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी बाजारात संत्रा फळांनाही मागणी वाढली आहे. संत्रा मागणीवाढीत कोरोनाचा प्रभावही अनुभवला जात आहे. त्यामुळे संत्रा दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात संत्रा दर ६०० ते १६०० रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात संत्र्याचे दर ६०० ते २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. येत्या काळात चांगल्या प्रतीच्या संत्रा दरात सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

संत्रा दरातील घसरणीमुळे उत्पादक अस्वस्थ झाले होते. ११ ते १४ हजार रुपये प्रतिटन असा संत्र्याचा दर होता. उन्हाची तीव्रता वाढल्याने संत्रा फळांच्या वाढलेल्या मागणीमुळे दरही २२ ते २९ हजार रुपये टनांवर पोचले आहेत. संत्र्याचा आकार आणि दर्जा हे दरावर परिणाम करणारे घटक ठरतात, असे सांगण्यात आले.

संत्र्याची आवक १० हजार क्‍विंटलच्या घरात आहे. बाजारात मोसंबीचीदेखील नियमित आवक आहे. मोठ्या आकाराच्या फळांची सरासरी आवक ४०० क्‍विंटल असल्याचे सांगण्यात आले. १५०० ते १७०० रुपये क्‍विंटलचा दर मोसंबीला होता. गव्हाची आवक १६५ क्‍विंटल; तर दर १७०० ते १८५० रुपये क्‍विंटलचे आहेत. हरभरा दर ३३५० ते ३८०१ तर आवक ७२८ क्‍विंटलची होती. तुरीचे दर गेल्या आठवड्यात ४३०० ते ४९७८ रुपये; तर या आठवड्यात ४४०० ते ४९५८ रुपयांवर पोचले. 

तुरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कमी झाली आहे. २८३० क्‍विंटल या आठवड्यात तर गेल्या आठवड्यात २६९५ क्‍विंटलची आवक झाली. सोयाबीनचे दर ३२५० ते ३६५० असे गेल्या आठवड्यात होते. त्यात ५० रुपयांची वाढ नोंदविण्यात येत हे दर ३७०० रुपयांवर पोचले. द्राक्ष आवक २६७ क्‍विंटल तर दर ५००० ते ६००० रुपये होते. 

डाळिंबाची ६५० क्‍विंटलची आवक झाली. डाळिंबाचे दर १५०० ते ७००० रुपये याप्रमाणे राहिले. बाजारात बटाटा आवक ४५१३ क्‍विंटलची होती. १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलचे दर बटाट्याला होते. लसूण आवक २२४९ तर दर २५०० ते ५००० रुपये होते. टोमॅटोची आवक ४० क्‍विंटल ५०० ते ६०० रुपयांचे दर राहिले.

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...