नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणा
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात डाळिंबांच्या दरात सुधारणा झाली.
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात डाळिंबांच्या दरात सुधारणा झाली. आवकेत घट झाल्याने चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रतिक्विंटलप्रमाणे चार हजार रूपयांची वाढ झाली. येथे डाळिंबाला प्रतिक्विंटल २ ते १४ हजारांचा दर मिळत आहे. भुसार व भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. दरात मात्र चढ-उतार होत आहे.
मोसंबीची २ ते ३ क्विंटलची आवक झाली. संत्र्यांची ७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २ हजार पाचशे, सिताफळाची ४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला. बोराची आवकही सुरु झाली आहे. दर दिवसाला १० ते १२ क्विटंल आवक होत आहे. ४०० ते १ हजार रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्यात टोमॅटोची दर दिवसाला ५० ते ६० क्विंटलची आवक आहे. १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २५ ते २७ क्विंटलची आवक झाली.
फ्लॉवरची ५० ते ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपये दर मिळाला. कोबीची ४० ते ५० क्विंटलची आवक होऊन ७०० ते १ हजार, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १ हजार, गवारची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजारांचा दर मिळाला. दोडक्याची २५ ते ३० क्विंटलची आवक झाली.
हिरव्या मिरचीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक झाली. शेवग्याची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार, आल्याची १५ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला.
शिमला मिरचीला १ हजार ते १५०० रूपये
आल्याच्या दरात गेल्या महिनाभराच्या तुलनेत काहिशी घरसण झाली. शिमला मिरचीची २३ ते ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजी, शेपूचीही आवक बऱ्यापैकी होती. मात्र, दरात काहीशी तेजी होती.
- 1 of 1028
- ››