agriculture news in marathi Improvement of pomegranate prices in the Nagar | Page 2 ||| Agrowon

नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात डाळिंबांच्या दरात सुधारणा झाली.

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात डाळिंबांच्या दरात सुधारणा झाली. आवकेत घट झाल्याने चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रतिक्विंटलप्रमाणे चार हजार रूपयांची वाढ झाली. येथे डाळिंबाला प्रतिक्विंटल २ ते १४ हजारांचा दर मिळत आहे. भुसार व भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. दरात मात्र चढ-उतार होत आहे. 

 मोसंबीची २ ते ३ क्विंटलची आवक झाली. संत्र्यांची ७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २ हजार पाचशे, सिताफळाची ४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला. बोराची आवकही सुरु झाली आहे. दर दिवसाला १० ते १२ क्विटंल आवक होत आहे. ४०० ते १ हजार रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्यात टोमॅटोची दर दिवसाला ५० ते ६० क्विंटलची आवक आहे. १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २५ ते २७ क्विंटलची आवक झाली. 

फ्लॉवरची ५० ते ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपये दर मिळाला. कोबीची ४० ते ५० क्विंटलची आवक होऊन ७०० ते १ हजार, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १ हजार, गवारची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजारांचा दर मिळाला. दोडक्याची २५ ते ३० क्विंटलची आवक झाली.

हिरव्या मिरचीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक झाली. शेवग्याची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार, आल्याची १५ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. 

शिमला मिरचीला १ हजार ते १५०० रूपये

आल्याच्या दरात गेल्या महिनाभराच्या तुलनेत काहिशी घरसण झाली. शिमला मिरचीची २३ ते ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजी, शेपूचीही आवक बऱ्यापैकी होती. मात्र, दरात काहीशी तेजी होती.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
तासगावात हिरव्या बेदाण्याला २४१ रुपये दरतासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
राजापुरी हळदीला उच्चांकी दर ; सांगलीतील...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
तुरीला क्विंटलला ६७०० रुपये दरनांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
राज्यात टोमॅटो १०० ते १००० रुपयेपुण्यात क्विंटलला ६०० ते ९०० रुपये पुणे ः...
पुण्यात भाजीपाला आवक आणि दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरव्या मिरचीला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मका दरात सुधारणा; आवक वाढलीजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
राज्यात हरभरा ३१०० ते ४७५० रुपयेहिंगोली क्विंटलला ४०५० ते ४२५० रुपये...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...