नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
बाजारभाव बातम्या
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात सुधारणा
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवडा, भेंडी, काकडी, गाजराची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने दरात सुधारणा राहिली.
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवडा, भेंडी, काकडी, गाजराची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने दरात सुधारणा राहिली.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची प्रतिदिन ३ ते ५ क्विंटल आवक राहिली. भेंडीची ४ ते ७ क्विंटल, काकडीची २० ते ३० क्विंटल आणि गाजराची १० ते २० क्विंटल अशी आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक अशीच जेमतेम राहिली. पण त्या तुलनेत मागणी वाढल्याने दरात मात्र तेजी राहिली.
घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान ३००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ४२०० रुपये, काकडीला किमान २०० रुपये, सरासरी २५० रुपये आणि सर्वाधिक ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांग्यांच्या दरात किंचित चढ-उतार वगळता त्यांचे दर स्थिर राहिले.
टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये तर वांग्याला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २४०० रुपये असा दर मिळाला.
डाळिंब, द्राक्षाचे दर स्थिर
डाळिंब आणि द्राक्षाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होतो आहे. द्राक्षाचे दर काहीसे स्थिर असले, तरी डाळिंबाच्या दरातील तेजी पुन्हा टिकून आहे द्राक्षाची आवक रोज साधारण एक ते तीन टनापर्यंत राहिली. तर डाळिंबांची आवक अगदीच जेमतेम १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक १६ हजार रुपये, तर द्राक्षाला चारकिलोच्या पेटीला किमान ४० रुपये, सरासरी ९० रुपये आणि आणि सर्वाधिक १६० रुपये असा दर मिळाला.
- 1 of 70
- ››