Agriculture news in marathi Improvement in price of orange in Nagpur | Agrowon

नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

नागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या संत्राफळांची देशांतर्गंत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यामुळे संत्रादरात सुधारणा झाली आहे.

नागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या संत्राफळांची देशांतर्गंत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यामुळे संत्रादरात सुधारणा झाली आहे. कळमणा बाजार समितीत संत्रादर ६०० ते २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे दर ६०० ते १५०० रुपये क्‍विंटल इतके होते.

संत्र्यांची रोजची सरासरी आवक साडेसहा हजार क्‍विंटलची असल्याचे सांगण्यात आले. डोमॅस्टिकस्तरावर संत्रा फळांना अचानक मागणी वाढली आहे. मुख्य निर्यातदार असलेल्या बांग्लादेशचाही त्यामध्ये समावेश आहे. मागणी वाढल्याच्या परिणामी बांग्लादेशमध्ये, देशातंर्गंत बाजारपेठेतही दरात तेजी आली आहे. १५०० टका (बांग्लादेशी चलन) असलेल्या संत्र्याचे दर २००० टकावर पोचले आहेत.

देशाअंतर्गंत बाजारात ६०० ते २२०० रुपये क्‍विंटलचे दर संत्र्याला मिळत आहे. बाजारात हरभरा आवक ९२३ क्‍विंटलची आहे. हरभऱ्याचे दर गेल्या आठवड्यात ३४०० ते ३८५१ रुपये होते. या आठड्यात हरभऱ्याचे व्यवहार ३४०० ते ३७२४ रुपयांनी झाले. हरभरा दरात काही अंशी असे चढउतार अनुभवले जात आहेत. 

तुरीची आवक २९४८ क्‍विंटलची होती. या आठवड्यात तुरीची आवक ३६११ क्‍विंटलवर पोचली. तुरीचे दर ४४०० ते ५००२ रुपये होते. या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५०८८ रुपयांवर पोचले आहेत. सोयाबीनचे व्यवहार गेल्या आठवड्यात ३३०० ते ३६१० रुपये क्‍विंटलने झाले. तर, आवक १५६ क्‍विंटलची होती. या आठवड्यात आवक २४९ क्‍विंटलची आणि दर ३२५० ते ३७०० रुपयांवर पोचले. बाजारात मोसंबीची आवक १००० क्‍विंटलची आहे. मोसंबीचे दर १५०० ते १७०० रुपये आहेत. मोठ्या आकाराच्या फळांना हेच दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

केळीचे दर ४५० ते ५५० रुपये

बाजारात केळीचे दर ४५० ते ५५० रुपयांवर स्थिर आहेत. गेल्या महिनाभरापासून हीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष आवक २५० क्‍विंटल, तर दर ५००० ते ६००० रुपयांवर स्थिर आहेत. डाळिंब दर १५०० ते ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. डाळिंबांची आवक ६७९ क्‍विंटलची आहे. बाजारातील बटाटा आवक ४६८९ क्‍विंटलची आहे.

बटाटा मध्य प्रदेशातल छिंदवाडा भागातून बाजारात पोचत आहे. बटाट्याला सरासरी १५०० ते १७००  रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. लाल कांदा आवक २००० क्‍विंटलची असून दर १५०० ते २२०० रुपये होता. लसूण दर २५०० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक ३१८६ क्‍विंटलची होती.


इतर बाजारभाव बातम्या
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...