पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात सुधारणा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून दहा दिवसांची संपूर्ण टाळेबंदी जाहीर केल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी घरगुती ग्राहकांसह व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी सर्वच भाजीपाल्याच्या दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर बाजार आवारासह बाजार समितीमध्ये येणाऱ्या शिवनेरी या प्रमुख रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.
Improvement in prices of all vegetables in Pune
Improvement in prices of all vegetables in Pune

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून दहा दिवसांची संपूर्ण टाळेबंदी जाहीर केल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी घरगुती ग्राहकांसह व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी सर्वच भाजीपाल्याच्या दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर बाजार आवारासह बाजार समितीमध्ये येणाऱ्या शिवनेरी या प्रमुख रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ७ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार आग्रा इंदौर येथून २७ ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ८०० गोणी, कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे ६०० क्रेट, सिमला मिरची ८ टेम्पो, भुईमूग सुमारे १५० गोणी, तांबडा, कांदा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे कांदा - ६०-१००, बटाटा -२५०-३००, लसूण - ४००-८००, आले सातारी - २५०-४००, भेंडी २००-२५०, गवार - गावरान, सुरती - २५०-३५०, टोमॅटो -३००-४००, दोडका ३००-३५०, हिरवी मिरची - २५०-३००, दुधी भोपळा - १००-१५०, चवळी -२००-२५०, काकडी -२००-२५०, कारली हिरवी - २५०-३००, पांढरी -२००-२२०, पापडी - १५०-२००, पडवळ -२५०-३००, फ्लॉवर २००-२५०, कोबी -१२०-१४०, वांगी -२००-२५०, डिंगरी - २००-२५०, नवलकोल - १००-१२०, ढोबळी मिरची - ३५०-४००, तोंडली- कळी २५०-३००, जाड -१४०-१५०, शेवगा -४००-५००, गाजर - इंदौर -२००, वालवर - २५०-३००, बीट २५०-३००, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -३००-३५०, घोसावळे १८०-२००, मटार परराज्य - ८५०-१०००, पावटा ६००-६५०, तांबडा भोपळा - ६०-१००,  सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर कोथिंबीर - ५००-१०००, मेथी १०००-१६००, शेपू ४००-६०० कांदापात ८००-१२००, चाकवत ५००-६००, करडई -४००-५००, पुदिना - ३००-५००, अंबाडी -४००-५००, मुळे ८००-१०००, राजगिरा - ४००-५००, चुका ५००-६००, चवळई -४००-६००, पालक ५००-८००

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-५०, गुलछडी : ५-३०, कापरी : १०-३०, शेवंती : १०-३०, अ‍ॅस्टर : १०-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : १०-३०, लिलि बंडल : १-२, जर्बेरा : ५-१५, मोगरा : १५०-२५०. जुई -१५०-२५०

फळांचा बाजार रविवारी (ता. १२) येथील फळबाजारात संत्री २ टन तर मोसंबी सुमारे १० टन, डाळिंब सुमारे ८० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे तीन हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबुज ४ टेम्पो आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन ) : ८०-२५०, संत्रा : (३ डझन) : २००-४०० (४ डझन) - १००-२२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-१५, सीताफळ - ५-७० आषाढ महिना सुरु असून, रविवारी (ता. १२) चिकन मटणाला मागणी वाढली होती. यामध्ये प्रामुख्याने चिकनच्या मागणीला ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. त्यातुलेनत दर देखील वाढले होते. मात्र ग्राहकांकडे कोरोना संकटामुळे पैसे नसल्याने मटणाची मागणी संथ होती.

अंडी : गावरान शेकडा - ६८०, डझन -९०, प्रति नग ७.५, इंग्लिश शेकडा - ३७०, डझन ५४, प्रतिनग ४.५

चिकन - १८०, लेगपीस २१०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस - २८०

मटण - बोकड - ६००, बोलाई - ६२०, खिमा - ६२०, कलेजी - ६४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com