Agriculture news in Marathi Improvement in prices of all vegetables in Pune | Agrowon

पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून दहा दिवसांची संपूर्ण टाळेबंदी जाहीर केल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी घरगुती ग्राहकांसह व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी सर्वच भाजीपाल्याच्या दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर बाजार आवारासह बाजार समितीमध्ये येणाऱ्या शिवनेरी या प्रमुख रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून दहा दिवसांची संपूर्ण टाळेबंदी जाहीर केल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी घरगुती ग्राहकांसह व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी सर्वच भाजीपाल्याच्या दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर बाजार आवारासह बाजार समितीमध्ये येणाऱ्या शिवनेरी या प्रमुख रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ७ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार आग्रा इंदौर येथून २७ ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ८०० गोणी, कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे ६०० क्रेट, सिमला मिरची ८ टेम्पो, भुईमूग सुमारे १५० गोणी, तांबडा, कांदा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
कांदा - ६०-१००, बटाटा -२५०-३००, लसूण - ४००-८००, आले सातारी - २५०-४००, भेंडी २००-२५०, गवार - गावरान, सुरती - २५०-३५०, टोमॅटो -३००-४००, दोडका ३००-३५०, हिरवी मिरची - २५०-३००, दुधी भोपळा - १००-१५०, चवळी -२००-२५०, काकडी -२००-२५०, कारली हिरवी - २५०-३००, पांढरी -२००-२२०, पापडी - १५०-२००, पडवळ -२५०-३००, फ्लॉवर २००-२५०, कोबी -१२०-१४०, वांगी -२००-२५०, डिंगरी - २००-२५०, नवलकोल - १००-१२०, ढोबळी मिरची - ३५०-४००, तोंडली- कळी २५०-३००, जाड -१४०-१५०, शेवगा -४००-५००, गाजर - इंदौर -२००, वालवर - २५०-३००, बीट २५०-३००, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -३००-३५०, घोसावळे १८०-२००, मटार परराज्य - ८५०-१०००, पावटा ६००-६५०, तांबडा भोपळा - ६०-१००,  सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - ५००-१०००, मेथी १०००-१६००, शेपू ४००-६०० कांदापात ८००-१२००, चाकवत ५००-६००, करडई -४००-५००, पुदिना - ३००-५००, अंबाडी -४००-५००, मुळे ८००-१०००, राजगिरा - ४००-५००, चुका ५००-६००, चवळई -४००-६००, पालक ५००-८००

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : ३०-५०, गुलछडी : ५-३०, कापरी : १०-३०, शेवंती : १०-३०, अ‍ॅस्टर : १०-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : १०-३०, लिलि बंडल : १-२, जर्बेरा : ५-१५, मोगरा : १५०-२५०. जुई -१५०-२५०

फळांचा बाजार
रविवारी (ता. १२) येथील फळबाजारात संत्री २ टन तर मोसंबी सुमारे १० टन, डाळिंब सुमारे ८० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे तीन हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबुज ४ टेम्पो आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन ) : ८०-२५०, संत्रा : (३ डझन) : २००-४०० (४ डझन) - १००-२२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-१५, सीताफळ - ५-७०
आषाढ महिना सुरु असून, रविवारी (ता. १२) चिकन मटणाला मागणी वाढली होती. यामध्ये प्रामुख्याने चिकनच्या मागणीला ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. त्यातुलेनत दर देखील वाढले होते. मात्र ग्राहकांकडे कोरोना संकटामुळे पैसे नसल्याने मटणाची मागणी संथ होती.

अंडी : गावरान शेकडा - ६८०, डझन -९०, प्रति नग ७.५, इंग्लिश शेकडा - ३७०, डझन ५४, प्रतिनग ४.५

चिकन - १८०, लेगपीस २१०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस - २८०

मटण - बोकड - ६००, बोलाई - ६२०, खिमा - ६२०, कलेजी - ६४०


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात बाजरी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये...
परभणीत दोडका २५०० ते ४००० रुपये...परभणी  ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ५००० हजार...औरंगाबादेत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची सरासरी ५६२५ रुपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारायणगांव बाजारात टोमॅटो दरात सुधारणा पुणे: कोरोना संकटात राज्यात विविध ठिकाणी सुरु...
कोल्हापुरात टोमॅटो १००० ते ३००० रूपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
राज्यात केळी २५० ते १००० हजार रुपये...नांदेडमध्ये ६५० ते ८०० रूपये दर नांदेड  ः...
नाशिकमध्ये दोडका २९१० ते ७०८० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...