Agriculture news in marathi, Improvement in the prices of brinjal, fenugreek and spinach in the city | Agrowon

नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी, पालकच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दर दिवसाला नेहमीच्या तुलनेत काहीशी आवक वाढली.

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दर दिवसाला नेहमीच्या तुलनेत काहीशी आवक वाढली. आठवडाभरात वांगी, घोसाळ्यासह मेथी, पालकच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्ये सोयाबीनची आवक सर्वाधिक होत होती. 

नगर बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची दर दिवसाला १२० क्विंटलपर्यंत आवक झाली. १ हजार ते ४ हजार रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ७ हजार, फ्लॉवरची ३४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते  ५ हजार ५००, कोबीची ११२ क्विंटलची आवक होऊन ३०० ते१४००, काकडीची ६७ ते ७० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार २००, गवारीची ८ ते १० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार रुपयांचा दर मिळाला. 

घोसाळ्याची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. कारल्याची ४४ ते ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, भेंडीची ४३ ते ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४००० हजार, वाल शेंगांची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार, घेवड्याची ८ ते १० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते  ४ हजार रुपये, बटाट्याची ३५९ ते  ३७० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १३०० रुपये,  हिरव्या मिरचीची ८० ते ९० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार ५००, शेवग्याची ४ ते ७ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार, आल्याची ४० ते  ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते १८००, शिमला मिरचीची २८ ते ३० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला. 

मेथीच्या दररोज २ हजार ते २२०० जुड्यांची आवक होऊन प्रत्येकी १०० जुड्यांना १५०० ते ३३०० रुपये, कोथिंबिरीच्या ८ हजार ५०० ते ९ हजार जुड्यांची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. 

‘मुगाला ६९०० रुपयांपर्यंत दर’ 

‘‘नगर येथील बाजार समितीत मुगाची सध्या दररोज ३०० ते ३५० क्विंटलची आवक होत आहे. मुगाला ५२०० ते ६९०० व सरासरी ६०५० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची ७०० क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ५०५० पर्यंत दर मिळाला. तुरीला ४५०० ते ५५००, हरभऱ्याला ४ हजार ते ४ हजार ९००, उडीदाला ४३०० ते ६५००, लाल मिरचीला २९०० ते १४५०० रुपयापर्यंत दर मिळत आहे’’, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. 
 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकूननाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटलजळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये ...