नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात सुधारणा

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. दोडका प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार, वांगीला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५००, वांगी, भेंडीला ३ हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळाला आहे. भुसारची आवक जेमतेम सुरू आहे.
Improvement in prices of dodka, brinjal and okra in the Nagar
Improvement in prices of dodka, brinjal and okra in the Nagar

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. दोडका प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार, वांगीला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५००, वांगी, भेंडीला ३ हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळाला आहे. भुसारची आवक जेमतेम सुरू आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक गेल्या आठवडाभरात वाढली आहे. टोमॅटोची ९३ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १०००, वांगीची ११ ते १३ क्विंटलची आवक होऊन असून ४ हजार ते ४ हजार ५००, फ्लॉवरची ८९ ते ९५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५००, कोबीची ७९ क्विंटलची आवक होऊन ८०० हजार १२०० रुपये, काकडीची ११ ते १३ क्विंटलची आवक होऊन १००० ते १ हजार ८००, गवारची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ६ हजाराचा दर मिळाला. 

दोडक्याची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार रुपये, कारल्याची ३ ते ६ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळाला. भेंडीची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये, वाल शेंगाची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ६ हजार पाचशे रुपयाचा दर मिळाला. लसणाची सुरू असलेली मागणी कायम आहे. सध्या दररोज २८ ते ३० क्विंटलची आवक होत आहे. ५ हजार ते ९ हजार रुपयाचा दर मिळत आहे. 

हिरव्या मिरचीची ६० ते ७० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ३ हजार ५००, शेवग्याची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये, आल्याची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, शिमला मिरचीची  १७ ते २० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ३ हजार ५०० हजार रुपयाचा दर मिळाला. बटाट्याची ११५ क्विंटलची आवक होऊन ७०० ते १३०० रुपये दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजी, शेपूचीही आवक बऱ्यापैकी होती.

हरभऱ्याची आवक अधिक  गेल्या आठवडाभरात नगर बाजार समितीत भुसारची आवक बऱ्यापैकी होती. हरभऱ्याची दर दिवसाला १४० ते १५० क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार ३००, मुगाची ८८ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ५०० ते ६ हजार, उडदाची ९ ते १५ क्विंटलची आवक होऊन ४३०० ते ६ हजार ४००, सोयाबीनची १५ ते २० हजार क्विंटलची आवक होऊन ६२०० ते ६ हजार ४०० रुपयाचा दर मिळाला. गावरान ज्वारीच्या दरात मात्र सातत्याने चढउतार होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com