Agriculture news in Marathi Improvement in prices of dodka, brinjal and okra in the Nagar | Agrowon

नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात सुधारणा

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 15 जून 2021

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. दोडका प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार, वांगीला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५००, वांगी, भेंडीला ३ हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळाला आहे. भुसारची आवक जेमतेम सुरू आहे.

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. दोडका प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार, वांगीला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५००, वांगी, भेंडीला ३ हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळाला आहे. भुसारची आवक जेमतेम सुरू आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक गेल्या आठवडाभरात वाढली आहे. टोमॅटोची ९३ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १०००, वांगीची ११ ते १३ क्विंटलची आवक होऊन असून ४ हजार ते ४ हजार ५००, फ्लॉवरची ८९ ते ९५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५००, कोबीची ७९ क्विंटलची आवक होऊन ८०० हजार १२०० रुपये, काकडीची ११ ते १३ क्विंटलची आवक होऊन १००० ते १ हजार ८००, गवारची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ६ हजाराचा दर मिळाला. 

दोडक्याची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार रुपये, कारल्याची ३ ते ६ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळाला. भेंडीची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये, वाल शेंगाची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ६ हजार पाचशे रुपयाचा दर मिळाला. लसणाची सुरू असलेली मागणी कायम आहे. सध्या दररोज २८ ते ३० क्विंटलची आवक होत आहे. ५ हजार ते ९ हजार रुपयाचा दर मिळत आहे. 

हिरव्या मिरचीची ६० ते ७० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ३ हजार ५००, शेवग्याची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये, आल्याची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, शिमला मिरचीची  १७ ते २० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ३ हजार ५०० हजार रुपयाचा दर मिळाला. बटाट्याची ११५ क्विंटलची आवक होऊन ७०० ते १३०० रुपये दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, करडी भाजी, शेपूचीही आवक बऱ्यापैकी होती.

हरभऱ्याची आवक अधिक 
गेल्या आठवडाभरात नगर बाजार समितीत भुसारची आवक बऱ्यापैकी होती. हरभऱ्याची दर दिवसाला १४० ते १५० क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार ३००, मुगाची ८८ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ५०० ते ६ हजार, उडदाची ९ ते १५ क्विंटलची आवक होऊन ४३०० ते ६ हजार ४००, सोयाबीनची १५ ते २० हजार क्विंटलची आवक होऊन ६२०० ते ६ हजार ४०० रुपयाचा दर मिळाला. गावरान ज्वारीच्या दरात मात्र सातत्याने चढउतार होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...