agriculture news in Marathi improvement of raisin rate in Sangali Maharashtra | Agrowon

बेदाणा दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बेदाण्याचे दर दबावात होते. मात्र दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत बेदाण्याला मागणी वाढल्याने दरात प्रति किलोस २० ते २५ रुपयांनी वाढ झाली.

सांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बेदाण्याचे दर दबावात होते. मात्र दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत बेदाण्याला मागणी वाढल्याने दरात प्रति किलोस २० ते २५ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे उत्पादकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. एका महिन्यात ४० ते ४५ हजार टन बेदाण्याची विक्री झाल्याचे बेदाणा उद्योगातील जाणकारांनी सांगितले. 

दरवर्षी राज्यात बेदाण्याचे १ लाख ६० हजार ते १ लाख ९० हजार टन उत्पादन होते. मात्र यंदा विक्रमी २ लाख १० हजार टन उत्पादन झाले. ऐन हंगामात लॉकडाउन झाल्याने द्राक्ष विक्री ठप्प झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. दरम्यान, मार्च महिन्यात हिरव्या बेदाण्यास ९५ रुपये किलो ते १९० रुपये किलो असा दर होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशातील बाजारपेठा बंद असल्याने त्याची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बेदाणा शीतगृहात ठेवावा लागला. 

बाजार समित्या सुरू झाल्या, बेदाण्याचे सौदे निघू लागले. पण बाजारपेठेत अपेक्षित अशी मागणी नसल्याने दरात वाढ झाली नाही. जुलै ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत बेदाण्याचे दर स्थिर होते. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात राज्यात सुमारे ८५ ते ९० हजार टन बेदाणा शिल्लक होता.  

दरम्यान, दरवर्षी दसरा, दिवाळी सणाच्या निमित्ताने बेदाण्याला मागणी वाढते. यंदा दसरा आणि दिवाळी सणाला बेदाण्याची विक्री होईल का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत होता. परंतु देशातील सर्व बाजारपेठा, संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरू झाल्या. यामुळे बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली. परिणामी, एका महिन्यात सुमारे ४० ते ४५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सध्या ४० ते ४५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. शिल्लक असलेला बेदाणा हंगामाच्या अगोदर संपेल, अशी शक्यता बेदाणा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

झिरो पेमेंटसाठी बेदाणा सौदे बंद
दरवर्षीप्रमाणे यंदाही झिरो पेमेंटसाठी दिवाळीत महिनाभर बेदाणा सौदे बंद होते. या काळात व्यापारी, अडते आणि शेतकरी यांची येणी-देणी पूर्ण केली जातात. त्यानंतर पुन्हा बेदाण्याचे सौदे सुरू केले जातात.

बेदणा दर (प्रतिकिलो) 
हिरवा बेदाणा  : १२० ते २४० 
पिवळा बेदाणा  : ११५ ते १७० 
काळा बेदाणा : ५० ते ९० 

राज्यातील बेदाणा दृष्टिक्षेप
उत्पादन : २.१० लाख टन
बेदाण्याची विक्री : १.६५ ते  १.७० लाख टन
शिल्लक बेदाणा : ४० हजार ते ४५ हजार टन

प्रतिक्रिया
दिवाळी सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला चांगला दर मिळतो आहे. पुढे देखील दर स्थिर राहतील असा अंदाज आहे.
- अरविंद ठक्कर, बेदाणा व्यापारी, सांगली
 
बेदाण्याची झालेली दरवाढ ही चांगलीच आहे. त्यामुळे एक नवी उमेद निर्माण होईल. भविष्यात दरवाढ होईल, अशी आशा आहे.
- राजेंद्र पाटील, बेदाणा उत्पादक, सावळज, ता. तासगाव


इतर अॅग्रोमनी
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...
कापसाच्या दरात सुधाराची चिन्हेपुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३००...
केंद्रीय अर्थसंकल्पातून होणार सवलतींची...नवी दिल्ली ः कोरोनाच्या संसर्गामुळे...
मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच...शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत...
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर...कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे....
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ...कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना...
सुताच्या दरात मोठी वाढजळगाव ः जगभरातील प्रमुख आयातदारांकडून सुताची मोठी...
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी...
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी :...नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...