नगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा कायम

Improvement in rate of shevga continued in the Nagar
Improvement in rate of shevga continued in the Nagar

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून शेवग्याच्या दरांतील तेजी कायम आहे. आठवडाभरात ६५ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला १४ ते १५ हजार व सरासरी १४५०० रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्याची आवक कमी जास्त होत आहे. भुसारच्या आवकेत मात्र घट झाली आहे. 

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.

फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. काकडीची २०८ क्विंटलची आवक झाला. काकडीला ६०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. बटाट्याची ३८७६ क्विंटलची आवक झाली. एक हजार ते दोन हजार रुपयांचा दर मिळाला. घेवड्याची ३५ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपयांचा दर मिळाला.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

शिमला मिरचीची १२८ क्विंटलची आवक झाली आणि प्रती क्विंटलला २००० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. कोथिंबीर, पालक, मेथी, वाटाणा, डांगरलाही चांगली मागणी राहिली. भुसारमध्ये बाजरीची ५०७ क्विंटलची आवक झाली आणि १७११ ते २५०० रुपयाचा दर मिळाला. गावरान ज्वारीची १२१ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. तुरीची २६० क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला.

लाल मिरचीला १७.५० रुपयांचा दर

लाल मिरचीची ५९४ क्विंटलची आवक होऊन ५१९० ते १७०५० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची २८५ क्विंटलची आवक झाली. ३४०० ते ४२२५ रुपयांचा दर मिळाला. तर, ४७५ क्विंटल गुळडागाची आवक झाली. २७७५ ते ४५०० रुपयांचा दर मिळाला. मठाची ७ क्विंटलची आवक झाली आणि ७७०० रुपयांचा दर मिळाला. गव्हाची १७० क्विंटलची आवक झाली. दर २१५१ ते २५५० रुपयांचा दर मिळाला. मक्याची २०४ क्विंटलची आवक झाली आणि १८०० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com